Libya Army Chief Died। तुर्कीमध्ये एक भयानक विमान अपघात झाला असल्याची माहिती समोर येत आहे. ज्यामध्ये लिबियाच्या लष्करप्रमुखांसह चार अधिकाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अंकारा याठिकाणवरून उड्डाण केल्यानंतर विमानाचा ४० मिनिटांनी हवाई वाहतूक नियंत्रणाशी संपर्क तुटला आणि आपत्कालीन लँडिंगची सूचना देण्यात आली. मात्र, उड्डाणादरम्यान, विमान रडारवरून गायब होऊन क्रॅश झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. लिबियाचे पंतप्रधान अब्दुल हमीद दबेबाह यांनी याविषयी माहिती देताना, तुर्कीची राजधानी अंकाराजवळ झालेल्या विमान अपघातात लिबियाचे लष्करप्रमुख मोहम्मद अली अहमद अल-हद्दाद आणि चार अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे” असे म्हटले आहे. पंतप्रधान दबेबाह यांनी या अपघाताला एक दुःखद अपघात म्हटले. तसेच,” अधिकारी तुर्कीच्या दौऱ्यावरून परतत असल्याचे सांगितले. ही दुर्घटना राष्ट्रासाठी, लष्करी प्रतिष्ठानासाठी आणि त्याच्या सर्व लोकांसाठी मोठी हानी आहे, कारण आपण अशा व्यक्ती गमावल्या आहेत ज्यांनी प्रामाणिकपणा आणि समर्पणाने आपल्या देशाची सेवा केली. शिस्त, जबाबदारी आणि राष्ट्रीय वचनबद्धतेचे उदाहरण दिले” असे म्हटले आहे. Libya Army Chief Died। लिबियाचे पंतप्रधान अब्दुल हमीद यांनी सांगितले की, या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये आर्मी चीफ ऑफ स्टाफ अल-फितौरी गरिबिल, मिलिटरी मॅन्युफॅक्चरिंग अथॉरिटीचे संचालक महमूद अल-कतावी, अल-हद्दाद यांचे सल्लागार मुहम्मद अल-असावी दियाब आणि लष्करी छायाचित्रकार मुहम्मद उमर अहमद महजूब यांचा समावेश आहे. एका वरिष्ठ तुर्की अधिकाऱ्याने सांगितले की, या अपघातात तीन क्रू मेंबर्सचाही मृत्यू झाला आहे आणि त्यांनी स्पष्ट केले की, विमानाने विद्युत बिघाडाची तक्रार केल्यानंतर आपत्कालीन लँडिंगची विनंती केली होती. लिबियाचे चीफ ऑफ जनरल स्टाफ मोहम्मद अल-हद्दाद, त्यांच्या पथकातील चार सदस्य आणि तीन क्रू मेंबर्सना घेऊन जाणाऱ्या एका खाजगी जेटने विद्युत बिघाडामुळे हवाई वाहतूक नियंत्रण केंद्राला आपत्कालीन स्थितीची माहिती दिली आणि आपत्कालीन लँडिंगची विनंती केली. प्राथमिक तपास अहवालात तांत्रिक बिघाड हे प्राथमिक कारण असल्याचे नमूद करून लिबियाच्या लष्करी प्रमुखांच्या विमानाच्या अपघातात तोडफोड झाल्याची शक्यता नाकारण्यात आली आहे. तुर्कीचे गृहमंत्री अली येरलिकाया म्हणाले की, अंकाराच्या एसेनबोगा विमानतळावरून त्रिपोलीसाठी निघालेल्या व्यावसायिक विमानाचे अवशेष तुर्की जेंडरमेरीने हायमाना जिल्ह्यातील केसिकावाक गावापासून सुमारे दोन किलोमीटर दक्षिणेस शोधून काढले. लिबियन लष्करप्रमुख मोहम्मद अली अहमद अल-हद्दाद म्हणाले की, त्यांच्या भेटीदरम्यान त्यांनी त्यांचे तुर्की समकक्ष आणि इतर लष्करी कमांडर्सची भेट घेतली. Libya Army Chief Died।