पुणे जिल्हा | तिकीट कोणालाही असलेतरी एकजुटीने काम करू

कापूरहोळ, (वार्ताहर) – भोर विधानसभेसाठीचा उमेदवार हा धनुष्यबाण आहे. भोरची जागा शिवसेनेला निश्चित आहे, असा विश्वास शिवसेनेचे कुलदीप कोंडे यांनी व्यक्त केला.
महायुतीचा उमेदवार कोणताही असुदे त्याला निवडून आण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करा, तसेच मतदारपर्यंत पोहचले पाहिजे, असे आवाहन शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना कुलदीप कोंडे यांनी केले.
महायुतीचा आमदार भोर विधानसभेमध्ये सुवर्णकाळ आणेल, असे म्हणत कोंडे यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले.
वर्वे (ता. भोर) येथे दि १८ रोजी भोर वेल्हा मुळशी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्र्वभूमीवर शिवनेरी मंगल कार्यालयात शिवसेना शिंदे गट कार्यकर्त्यांच बैठक दुपारी पार पडली. युवा सेनेच्या वतीने आयोजिन केले होते.
या बैठकीला माजी मंत्री विजयबापू शिवतारे,युवासेना अध्यक्ष पूर्वेश सरनाईक, युवा सेना जिल्हा प्रमुख निलेश घारे, निलेश घारे, युवा सेना उपजिल्हा प्रमुख सोमनाथ कुटे, भोर तालुका युवा अध्यक्ष (शिवसेना शिंदे गट) गणेश मसुरकर, शिवसेना शिंदे गट माजी जिल्हा परिषद सदस्य कुलदीप तात्या कोंडे, माजी पंचायत समिती सदस्य अमोल पांगारे, तालुका उपाध्यक्ष दशरथ जाधव,
मुळशी तालुका प्रमुख दीपक करंजावणे, मुळशी तालुका युवा प्रमुख स्वप्निल सातपुते, युवती सेना तालुका प्रमुख रेणुका रोकडे, युवा अध्यक्ष भोर तालुका निलेश गाडे, भोर शहर प्रमुख नितीन साळुंखे, युवा सेना सचिव किरण साळी,
भोर शहरप्रमुख नितीन सोनवणे, मुळशी तालुका प्रमुख आबा करंजावणे, भोर तालुका प्रमुख स्वप्निल गाडे, वेल्हे तालुका युवासेना संघटक योगेश लिम्हण, सागर कडू, माऊली कोकाटे, प्रसाद घोडेकर, गणेश निगडे, अक्षय सणस व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
कोंडेची सेनेच्या तिकिटासाठी शिफारस करू
युवासेना अध्यक्ष पूर्वेश सरनाईक म्हणाले, मागील काळात झालेली चूक पुन्हा मतदार करणार नाहीत. धनुष्यबाणालाच विजयी करतील, महायुती सरकारचे कामाचे रिपोर्ट कार्ड हे घराघरामध्ये पोहचवतील, असा विश्वास व्यक्त करत कार्यकर्त्यांनी कामाला लागण्याचा सल्ला सरनाईक यांनी कार्यकर्त्यांना दिला.
तर विजय बापू शिवतारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे कुलदीप कोंडे यांना संधी द्यावी, अशी शिफारस करण्याचे आश्र्वासन या प्रसंगी बोलताना कार्यकर्त्यांना दिले.





