Pankaja Munde | Manoj Jarange – आपल्या समाजामधील दरी मिटवूया. जे गोपीनाथ मुंडेंचे व्यक्तिमत्व आहे तेच माझे व्यक्तिमत्त्व आहे, असे वक्तव्य मंत्री पंकजा मुंडे यांनी केले आहे. परळी येथे एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या. मी जरांगेच्या विरोधात बोलले नाही. लोकसभा निवडणुकीतील माझ्या भाषणाचा विपर्यास केला गेला आहे. आता नवीन उमेदीने काम करा. प्रत्येकाला एससी,एसटी व्हायचे आहे. जरांगे पाटील यांनी जरी उपोषण केले तरी मी पालकमंत्री म्हणून भेट द्यायला तयार आहे. एससी,एसटीचे आरक्षण केंद्र सरकार देते. मी कधीही निझामाचे गॅझेट असे बोलले नाही. मी जरांगे यांना देखील सांगू इच्छिते. आपल्या समाजामधील दरी मिटवूयात. मी कायद्याच्या चौकटीच्या बाहेर जाणार नाही. माझ्या जातीचा असला तरी चुकीच्या भूमिकेला पाठिंबा नाही, असे त्या म्हणाल्या. मी दररोज ४०० लोकांना भेटते. मी तुमच्या सुखात नाही तर दुःखात सोबत आहे. संघर्षात सोबत आहे. दारू बनवत असलो तरी आम्ही पाजत नाही. निवडणुकीत वज्रमूठ करा. अजित पवार यांच्याबरोबर युतीची चर्चा झाली आहे. काही ठिकाणी युती होईल. काही ठिकाणी होणार नाही. फक्त काम करा. इतर ठिकाणच्या उमेदवारासाठी माझ्याकडे येऊ नका, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. लोकांचे कारखाने गंजून गेले आहेत. मी गोपीनाथ मुंडेंचा वारसा आहे. मी कसा कारखाना विकेल? माझ्या कारखान्याला पैसे मिळाले नाहीत. सगळ्यांच्या कारखान्याला पैसे मिळाले. मी माझ्या बापाचे चौथ अपत्य जगवले आहे. यावेळी वैद्यनाथ कारखान्यात १० लाख मेट्रिक टन उसाचे गाळप होणार आहे, असे देखील मुंडे यांनी सांगितले.