Nevase News : जेऊर हैबती गावात बिबट्याची दहशत; गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
Nevase News : जेऊर गावात आता दिवसा ढवळ्या बिबटे थेट रस्त्यावर येत असून त्यांच्या या धास्तीमूळे परिसरात मोठी घाबरट पसरली जात आहे.

नेवासे : जेऊर हैबती (ता. नेवासे) गावात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा प्रचंड वावर वाढलेला असून वाड्या – वस्तीवर राहणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये या बिबट्याच्या धास्तीने दहशत बसली आहे. जेऊर गावात आता दिवसा ढवळ्या बिबटे थेट रस्त्यावर येत असून त्यांच्या या धास्तीमूळे परिसरात मोठी घाबरट पसरली जात आहे.
बुधवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास भर रस्त्यावर बिबट्याने अनेकांना दर्शन देवून धुमाकूळ घातल्यामुळे गावंकऱ्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे शेतकरी, शाळकरी विद्यार्थी आणि ग्रामस्थ सध्या रस्त्यावरून ये – जा करतांना जीव मुठीत धरून वावरतांना दिसून येते आहे.
दररोज कुठे ना कुठे रानात अनेकांना बिबट्याचे दर्शन होत असल्यामुळे महिला, लहान मुले आणि शेतकरी विद्यार्थ्यांमध्ये मात्र प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. वनविभागने या गंभीर बाबीकडे संपूर्णतः दुर्लक्ष केल्यामुळे जनसामान्य नागरिकांतून मोठा संताप व्यक्त केला जात आहे. जेऊर परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या या बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी वाड्या – वस्तीवर राहणाऱ्या नागरिकांतून केली जात आहे.
जेरबंद करण्याची मागणी
आमच्या जेऊर हैबती गावात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा प्रचंड वावर वाढलेला असून वन विभागाने या बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी या परिसरत पिंजरा लावून त्याला जेरबंद करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवानेते अब्दुलभैय्या शेख यांच्याकडे गावाकऱ्यांनी केली आहे.





