AI फीचर्ससह लेनोवोचा जबरदस्त लॅपटॉप लाँच, किंमत तुमच्या बजेटमध्ये; वैशिष्ट्ये एकदा पाहाच

Lenovo IdeaPad Slim 5 Details | लेनोवोने भारतात IdeaPad Slim 5 लॅपटॉप लाँच केला आहे. एआय फीचर्ससह येणाऱ्या या लॅपटॉपला खास नोकरी करणाऱ्यांसाठी डिझाइन करण्यात आले आहे. या लॅपटॉपला कंपनीने 14 इंट आणि 16 इंच अशा दोन मॉडेलमध्ये लाँच केले आहे. लेनोवोचा हा लॅपटॉप AMD Ryzen AI 300 Series प्रोसेसर आणि Zen 5 cores, RDNA 3.5 ग्राफिक्ससह येतो. कंपनीने लॅपटॉपला 1 लाख रुपयांच्या बजेटमध्ये लाँच केले आहे. Lenovo IdeaPad Slim 5 च्या किंमत आणि फीचर्सविषयी सविस्तर जाणून घेऊयात.
Lenovo IdeaPad Slim 5 ची किंमत
Lenovo च्या या लॅपटॉपला खरेदी करण्यासाठी तुम्हाला 91,990 रुपये खर्च करावे लागतील. लॅपटॉप लूना ग्रे आणि कॉस्मिक ब्लू रंगात येतो. कंपनीची अधिकृत वेबसाइट आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर लॅपटॉप खरेदीसाठी उपलब्ध आहे.
Lenovo IdeaPad Slim 5 चे फीचर्स
कंपनीने Lenovo IdeaPad Slim 5 ला 14 इंच आणि 16 इंच अशा दोन स्क्रिनसह लाँच केले आहे. 14 इंच मॉडेलमध्ये WUXGA OLED डिस्प्ले दिला असून, याचा रिफ्रेश रेट 120 हर्ट्ज आहे. तर 16 इंच मॉडेल टच आणि नॉन टच पर्यायासह येते. दोन्ही मॉडेल्समध्ये अँटी-ग्लेयर स्क्रीन आणि 500 निट्स ब्राइटनेसचा सपोर्ट मिळतो.
या लॅपटॉपमध्ये Ryzen AI 7 350 प्रोसेसर दिला असून, यात 32 जीबीपर्यंत रॅम आणि 1 टीबीपर्यंत स्टोरेजचा पर्याय मिळेल. हा लॅपटॉप विंडोज 11 वर काम करतो. यात 1080p FHD IR हायब्रिड कॅमेरा, बॅकलिट कीबोर्ड आणि 60Wh बॅटरी सारखे फीचर्स मिळतील.
कनेक्टिव्हिटीसाठी वाय-फाय 7, ब्लूटूथ 5.4, दोन यूएसबी टाइप-सी पोर्ट, दोन यूएसबी-ए पोर्ट, HDMI 2.1 आणि एक हेडफोन/माइक कॉम्बो दिले आहे. लॅपटॉपचे वैशिष्ट्ये म्हणजे यात एआय फीचर्सचा सपोर्ट मिळतो. यात Lenovo AI Now आणि Llama 3 सारखे एआय टूल्स दिले आहेत.


