Lemon Storage Tips: उन्हाळा सुरू झाला की घराघरात लिंबाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढतो. सरबत, शिकंजी, लिंबूपाणी यांसाठी लिंबू हा अत्यावश्यक घटक आहे. मात्र, या काळात लिंबाची मागणी वाढल्याने त्यांचे दरही वाढतात. त्यामुळे अनेकजण एकाच वेळी जास्त लिंबू खरेदी करून ठेवतात. पण काही दिवसांतच लिंबू कोरडे पडतात किंवा खराब होतात. त्यामुळे योग्य पद्धतीने साठवणूक करणं खूप महत्त्वाचं ठरतं. जर तुम्हाला लिंबू २ ते ३ आठवडे ताजे ठेवायचे असतील, तर काही सोपे आणि प्रभावी उपाय करून तुम्ही ते शक्य करू शकता. योग्य पद्धतीने साठवणूक केल्यास लिंबांचा ताजेपणा आणि रस कायम राहतो, तसेच वारंवार बाजारात जाण्याची गरजही कमी होते. ( Lemon Storage Tips ) पहिला आणि सर्वात सोपा उपाय म्हणजे तेलाचा वापर. यासाठी लिंबू आधी स्वच्छ धुवून पूर्णपणे कोरडे करून घ्या. त्यानंतर त्यावर हलकं मोहरीचं तेल किंवा नारळाचं तेल लावा. या तेलामुळे लिंबाच्या सालीवर एक संरक्षक थर तयार होतो, ज्यामुळे त्यातील ओलावा टिकून राहतो. त्यानंतर हे लिंबू एअरटाइट डब्यात ठेवून फ्रिजमध्ये ठेवा. या पद्धतीने लिंबू लवकर सुकत नाहीत आणि जास्त दिवस ताजे राहतात. ( Lemon Storage Tips ) Lemon जर तुम्हाला लिंबू आणखी जास्त काळ साठवून ठेवायचे असतील, तर दुसरा उपाय म्हणजे त्याचे तुकडे करून साठवणूक करणं. लिंबाचे छोटे तुकडे करून त्यावर मीठ लावा आणि ते काचेच्या बाटलीत भरून फ्रिजमध्ये ठेवा. या पद्धतीने लिंबू अनेक आठवडे सहज टिकतात आणि त्यांचा स्वादही कायम राहतो. हा उपाय विशेषतः रोजच्या वापरासाठी खूप उपयुक्त ठरतो. (Lemon Storage Tips) तिसरा उपाय म्हणजे पाण्यात साठवणूक करण्याचा. यासाठी लिंबू कापून स्वच्छ धुवून घ्या आणि काचेच्या एअरटाइट डब्यात ठेवा. त्यात इतकं पाणी घाला की सर्व लिंबू पूर्णपणे बुडतील. त्यानंतर डबा बंद करून फ्रिजमध्ये ठेवा. या पद्धतीत लिंबाचा ओलावा टिकून राहतो आणि ते सुकत नाहीत. मात्र, दर ७ ते १० दिवसांनी पाणी बदलणं आवश्यक आहे. हे सर्व उपाय अगदी सोपे आणि घरच्या घरी करता येण्यासारखे आहेत. योग्य पद्धतीने साठवणूक केल्यास लिंबू दीर्घकाळ ताजे राहतात आणि त्यांचा वापर करताना कुठलीही अडचण येत नाही. त्यामुळे उन्हाळ्यात लिंबू वाया जाण्याची चिंता न करता हे उपाय नक्की करून पाहा.