विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांची वाघोलीतील गणेश मंडळांना भेट
Updated On:

वाघोली – वाघोली (ता. हवेली) येथील प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या वाघेश्वर तरुण मंडळाच्या गणरायाच्या आरतीसाठी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी भेट देत आरती केली.
वाघोली आणि पंचक्रोशीतील नागरिकांनी तसेच मंडळाच्या वतीने गोऱ्हे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मंडळाच्या वतीने आध्यात्मिक संस्काराची परंपरा जोपासण्यासाठी कीर्तन महोत्सव आयोजित केल्याबद्दल उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी मंडळाच्या उपक्रमाचे कौतुक केले.
यावेळी मंडळाचे संस्थापक माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दाभाडे, शिंदे गटाच्या शिवसेना नेत्या सारिका पवार, शोभा भाडळे, मंडळाचे अध्यक्ष चैतन्य सातव, उपाध्यक्ष लखन भाडळे, जयसिंग भाडळे, प्रमोद भाडळे, संतोष तांबे, निखिल भाडळे, शेखर बढे, विनोद सातव, राजेंद्र भाडळे, बापू शिंदे, संतोष सातव, सुनील सातव आदी मान्यवर उपस्थित होते.





