विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी वाघोलीतील लाडक्या बहिणींशी साधला संवाद
Updated On:

वाघोली – महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी गणेशोत्सवानिमित्त वाघोलीतील गणेश मंडळांना भेट देत लाडक्या बहिणींशी संवाद साधत मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना, घरकामगार महिला तसेच विविध योजनेबाबत माहिती देऊन विचारपूस केली. यानंतर पत्रकारांशी बोलतांना गोऱ्हे म्हणाल्या की, महिला सक्षमीकरणाचा पुढचा पल्ला अजून खूप आव्हानात्मक आहे.
मोठ्या प्रमाणात सुरक्षेसाठी कायद्याची अंमलबजावणीची यंत्रणा उभी करण्याचा संकल्प गौरी गणपतीच्या निमीत्ताने केला. या कामांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पूर्णतः सहकार्य मिळेल अशी देखील त्यांनी खात्री व्यक्त केली. यावेळी शिवसेना पुणे जिल्ह्यातील महिला पदाधिकारी, वाघोली ग्रामस्थ उपस्थित होते.





