Singer Pass Away : संगीत विश्वावर शोककळा ! ‘या’ प्रसिद्ध गायिकेचं निधन
श्रीलंकेच्या संगीत विश्वात आपल्या धारदार स्वरांनी सामाजिक आणि राजकीय व्यवस्थेला थेट आव्हान देणाऱ्या ज्येष्ठ गायिका नंदा मालिनी यांनी (Singer Pass Away) जगाचा निरोप घेतला आहे.

Singer Pass Away : श्रीलंकेच्या संगीत विश्वात आपल्या धारदार स्वरांनी सामाजिक आणि राजकीय व्यवस्थेला थेट आव्हान देणाऱ्या ज्येष्ठ गायिका नंदा मालिनी यांनी (Singer Pass Away) जगाचा निरोप घेतला आहे. वयाच्या ८२ व्या वर्षी नावला येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
विशेष म्हणजे, अवघ्या काही दिवसांवर म्हणजेच २३ ऑगस्ट रोजी त्यांचा ८३ वा वाढदिवस असतानाच काळाने त्यांच्यावर घाला घातला, ज्यामुळे जगभरातील त्यांच्या चाहत्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
कालुतारा येथील एका सर्वसामान्य गावातील नऊ भावंडांच्या मोठ्या कुटुंबात चौथ्या क्रमांकावर जन्मलेल्या नंदा मालिनी यांच्यातील प्रतिभेची चुणूक बालपणीच दिसली होती. कोलंबोमध्ये शालेय शिक्षण घेत असताना १९५६ मध्ये त्यांनी एका कविता गायन (Singer Pass Away) स्पर्धेत मिळवलेल्या यशाने त्यांच्या ऐतिहासिक संगीत प्रवासाचा पाया रचला. त्यानंतरच्या दशकांत त्यांनी आपल्या कलेला केवळ मनोरंजनाचे साधन न ठेवता अन्यायाविरुद्ध लढण्याचे प्रभावी माध्यम बनवले.
१९७० आणि १९८० चे दशक श्रीलंकेसाठी प्रचंड उलथापालथीचे होते. बेरोजगारी, राजकीय अस्थिरता, सामाजिक विषमता आणि जातीय तणावाच्या काळात १९८३ मध्ये देशात गृहयुद्धाचा भडका उडाला. या अशांत काळात नंदा मालिनी यांनी आपल्या गीतांमधून भ्रष्टाचार, अन्याय आणि सरकारी दडपशाहीवर अत्यंत निर्भीड प्रहार केले.
वांशिक व धार्मिक भेद विसरून अन्यायाविरोधात एकत्र येण्याचे आवाहन त्यांच्या गाण्यांनी केले. त्यांच्या या बंडखोर स्वरांमुळे राष्ट्रीय प्रसारमाध्यमांवर त्यांच्या गीतांवर बंदी लादण्यात आली, तरीही जनमानसातील त्यांची लोकप्रियता तसूभरही कमी झाली नाही.
१९८७ मध्ये आलेला त्यांचा ‘पवाना’ हा अल्बम मानवी हक्क आणि सरकारी दडपशाहीविरुद्धचा एक जिवंत संगीतमय दस्तऐवज ठरला. वयाच्या अखेरच्या टप्प्यातही त्यांचा व्यवस्थेविरोधातील लढा थांबला नव्हता; २०२२ मधील ऐतिहासिक (Singer Pass Away) आर्थिक संकटाच्या काळात जनक्षोभ उसळला असता, त्यांनी उघडपणे रस्त्यावर उतरून आंदोलकांना पाठिंबा दिला आणि सादरीकरण केले. आपल्या अखंड प्रवासात सामान्य जनतेचा आवाज बनलेल्या या महागायिकेच्या जाण्याने श्रीलंकेच्या सांस्कृतिक विश्वात कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे.






