satara | लक्ष्मणराव पाटील यांच्या जयंतीदिनी उद्या भुईंज येथे व्याख्यान

भुईंज, (प्रतिनिधी) – सातारा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार, किसन वीर साखर कारखाना व जिल्हा बँकेचे माजी चेअरमन, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष लक्ष्मणराव पाटील यांच्या 86 व्या जयंतीनिमित्त भुईंज येथील किसन वीर सातारा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर रविवार, दि. 25 रोजी दुपारी 1 वाजता ग्रामीण साहित्यिक व वक्ते प्राचार्य रवींद्र येवले यांचे व्याख्यान होणा असल्याची महिती कारखान्याचे उपाध्यक्ष प्रमोद शिंदे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
माजी खासदार लक्ष्मणराव (तात्या) पाटील यांनी सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवला होता. त्यांच्या जयंतीनिमित्त रविवारी दुपारी 1 वाजता कारखाना कार्यस्थळावर प्राचार्य रवींद्र येवले यांचे व्याख्यान होणार असून, किसन वीर साखर कारखान्याचे चेअरमन व आमदार मकरंद पाटील अध्यक्षस्थान भूषविणार आहेत.
या व्याख्यानास कारखाना कार्यक्षेत्रातील सभासद, हितचिंतक, कंत्राटदार, वाहनमालक आणि कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा बँकेचे चेअरमन नितीनकाका पाटील, कारखान्याचे कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे व संचालकांनी केले आहे.
बोपेगाव येथे कीर्तन
माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त, त्यांच्या जन्मगावी, बोपेगाव, ता. वाई येथे सायंकाळी ह. भ. प. पारसमहाराज मुथा यांचे कीर्तन होणार आहे. सर्वांनी या कीर्तनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन बोपेगाव ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आले आहे.





