Lebanon: लेबेनॉनमध्ये 2 वर्षांनी नवीन सरकार स्थापन; नवाफ सलाम नवे पंतप्रधान

बैरुत (लेबेनॉन) – लेबनॉनच्या नवीन पंतप्रधानांनी शनिवारी २०२२ नंतर देशातील पहिले पूर्ण सरकार स्थापन केले. अध्यक्ष जोसेफ आऊन यांनी माजी काळजीवाहू सरकारचा राजीनामा स्वीकारला आहे आणि नवीन पंतप्रधान नवाफ सलाम यांच्यासोबत नवीन सरकार स्थापन करण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली असल्याचे एका निवेदनात जाहीर केले.
सलाम यांचे २४ मंत्र्यांच्या मंत्रिमंडळात ख्रिश्चन आणि मुस्लिम मंत्र्यांची समान संख्या आहे. सलाम यांची देशाचे पंतप्रधान म्हणून नियुक्ती झाल्यानंतर एका महिन्यापेक्षा कमी कालावधीत हे मंत्रिमंडळ स्थापन करण्यात आले आहे. लेबनॉन इस्रायल आणि हिजबुल्लाह दहशतवादी गटातील संघर्ष शांत व्हायला लागला आहे.
तसेच लेबेनॉनच्या दक्षिणेकडील सीमेवर सुरक्षा निर्माण करण्याचा प्रयत्न लेबेनॉनकडून केला जात असतानाच हे नवीन सरकार स्थापन करण्यात आले आहे. अमेरिकेच्या मध्यस्थीने इस्रायल आणि लेबेनॉनमधील हिज्बुल्लाहमधील संघर्ष नोव्हेंबरमध्ये थांबला आहे.
लेबेनॉनमध्ये गेल्या ६ वर्षांपासून आर्थिक संकट गडद झाले आहे. या आर्थिक संकटामुळे तेथील बँक व्यवस्था कोलमडली आहे. सरकारी वीज क्षेत्र उद्ध्वस्त केले आहे आणि आपली बचत केलेली पुंजी वापरू न शकल्यामुळे अनेकांना दारिद्र्यात ढकलले आहे.
आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे माजी अध्यक्ष आणि मुत्सदी असलेल्या सलाम यांनी लेबनॉनच्या न्यायव्यवस्थेत आणि उद्ध्वस्त अर्थव्यवस्थेत सुधारणा करण्याची हमी दिली आहे. अनेक दशकांपासून असंख्य आर्थिक, राजकीय आणि सुरक्षा संकटांना तोंड देणाऱ्या या अशांत देशात स्थिरता आणण्याचे वचनही त्यांनी जनतेला दिले आहे.





