Prajakta Mali | अभिनेत्री प्राजक्ता माळीने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या विनोदी कार्यक्रमाचे सूत्रसंचालनद्वारे सध्या ती प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. नुकतेच तिने एका मुलाखतीत महिलांना खास सल्ला दिला आहे. यावेळी तिने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाबद्दल केलेले वक्तव्य चांगलेच चर्चेत आले आहे. प्राजक्ता माळीने एका मुलाखतीदरम्यान म्हटले, “जे तुम्हाला करावसं वाटतंय त्या गोष्टीला जरूर न्याय द्या. मार्ग निघतील, मार्ग काढा आणि महिला करू शकत नाही, अशी कुठलीही गोष्ट नाही. महिला अष्ठावधीनी असते, ती एका वेळी आठ गोष्टी करू शकते. त्यामुळे हा प्रश्नच नाही की जमेल की नाही.” पुढे ती म्हणाली, “संसार, वय, पोरं सगळं बाजूला ठेऊन सुद्धा तुम्ही तुमची स्वप्नं साकार करू शकता आणि वय तर विषयच बाजूला ठेवा. वय वैगेरे असं काही नसतं. मात्र, प्रकृतीची काळजी घेतली पाहिजे. आरोग्य महत्त्वाचे आहे. ते जर तुम्ही व्यवस्थित ठेवलं तर पन्नाशीत गेल्यानंतरही तुम्ही नवीन काहीतरी सुरू करू शकता आणि करायलाच पाहिजे. सगळ्या महिलांनी आर्थिक स्वावलंबी असलं पाहिजे, या मताची मी आहे. कारणती गोष्ट असल्यानंतर तुम्हाला आपसूक घरामध्ये आदर मिळतो. तुमच्या मताला महत्त्व असते.” प्राजक्ता अलीकडेच ‘फुलवंती’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. आता पुन्हा एकदा ती ‘चिकी चिकी बुबूम बुम’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हेही वाचा: मृत्यूशी झुंज ! ४५ तासांनंतरही बोगद्यात अडकले ८ कामगार ; चिखल अन् ढिगाऱ्यामुळे बचावकार्यात अडथळा