Tennis : पेस-अमृतराज यांना मिळाला मोठा सन्मान, आशियाई खेळाडूंनी प्रथमच ‘या’ विशेष यादीत मिळवले स्थान…

International Tennis Hall of Fame :- दुहेरीतील माजी जागतिक क्रमवारीत अव्वल खेळाडू लिएंडर पेस आणि टेनिस प्रसारक अभिनेता आणि खेळाडू विजय अमृतराज शनिवारी आंतरराष्ट्रीय टेनिस हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट होणारे पहिले आशियाई पुरुष खेळाडू ठरले. प्रख्यात ब्रिटीश टेनिस पत्रकार, लेखक रिचर्ड इव्हान्स यांच्यासह या दोघांना हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट करण्यात आले.
टेनिस हे करिअर म्हणून निवडण्यापूर्वी पेसने फुटबॉल आणि हॉकीमध्येही हात आजमावला होता. पेसचे वडील वेस पेस हे १९७२च्या म्युनिक ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकणाऱ्या भारतीय हॉकी संघाचे सदस्य होते. वडीलांच्या पावलावर पाऊल ठेवत पेसने आजवर त्याच्या क्रीडा कारकिर्दीला आकार दिला आहे.
Infosys would like to congratulate @Leander, @Vijay_Amritraj, and Richard Evans on their induction into Newport’s @TennisHalloFame on this historic day!#ITHFWithInfosys #ExperienceTheNext pic.twitter.com/hownFFmkLc
— Infosys (@Infosys) July 20, 2024
याप्रसंगी पेस बोलाताना भावनिक झालेला दिसला. तो म्हणाला, ‘या मंचावर केवळ खेळातील महान व्यक्तींसोबतच नाही तर माझ्या आयुष्यातील प्रत्येक दिवशी मला प्रेरणा देणाऱ्या लोकांसोबत असणे हा माझ्यासाठी सर्वात मोठा सन्मान आहे. यांनी केवळ ग्रँड स्लॅम जिंकले नाही, टेनिस खेळाला आकार दिला नाही, तर या प्रत्येकाने आम्ही राहत असलेल्या जगाला आकार देत वेगळा संदेश दिलेला आहे.
“जर तुमचा स्वतःवर विश्वास असेल तर तुम्ही कठोर परिश्रम केवळ बक्षीस आणि ट्रॉफी जिंकण्यासाठी नव्हे तर जगाला प्रेरणा देण्यासाठी करता. सात ऑलिम्पिकमध्ये माझ्या देशवासीयांसाठी खेळणे, त्या सर्व डेव्हिस चषकांमध्ये राष्ट्रगीतासाठी उभे राहणे आणि आपण आशियाई ग्रँडस्लॅम जिंकू शकतो, आपल्या प्रदेशात प्रथम क्रमांक मिळवू शकतो हे सिद्ध करणे ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट होती.”
– लिएंडर पेस, माजी टेनिसपटू
दुसरीकडे, 70 वर्षीय अमृतराज यांनी 1970 मध्ये पदार्पण केले आणि 1993 मध्ये निवृत्ती घेतली. या कालावधीत, त्यांनी 15 एटीपी एकेरी विजेतेपद आणि 399 सामने जिंकले आणि एकेरीमध्ये 18 वे स्थान मिळविले. त्यांनी 1974 आणि 1987 मध्ये भारताला डेव्हिस करंडक फायनलमध्ये पोहोचण्यास मदत केली होती. निवृत्तीनंतर, अमृतराज यांनी मानवतावादी चळवळीत भाग घेतला. तसेच जेम्स बाँड आणि स्टार ट्रेक चित्रपट मालिकेत काम देखील केले.
पेसची कारकिर्द…
लिएंडर पेस दुहेरी आणि मिश्र दुहेरीत १८ वेळा ग्रँडस्लॅम चॅम्पियन आहे. अमृतराज युथ अकादमीत खेळल्यानंतर त्याची खेळाडू प्रकारात निवड झाली. पेस आणि अमृतराज यांनी हॉल ऑफ फेममध्ये प्रतिनिधित्व करणारे भारत 28 वे राष्ट्र बनवले. पेसने पुरुष आणि मिश्र दुहेरीत कारकिर्दीत ग्रँडस्लॅम जिंकले आहे.





