Legends League Cricket : सेहवागच्या जागी कैफकडे नेतृत्व
Updated On:

नवी दिल्ली – भारताचा आक्रमक सलामीवीर फलंदाज वीरेंद्र सेहवागने कौटुंबिक कारणाने पहिल्या सामन्यातून माघार घेतल्यामुळे लेजंड्स क्रिकेट लीगच्या सलामीच्या लढतीत महंमद कैफकडे इंडिया महाराजा इलेव्हन संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे.
लेजंड क्रिकेट लीग स्पर्धेला गुरुवारपासून सुरुवात झाली. सलामीच्या सामन्यापूर्वीच इंडिया महाराजाला सेहवागने पहिल्याच सामन्यातून माघार घेतल्याने मोठा धक्का बसला आहे. सेहवागच्या अनुपस्थितीत कैफ संघाचे नेतृत्व करणार आहे.





