सरकारला फक्त दारुड्यांची काळजी – प्रविण दरेकर

Updated On:
सरकारला फक्त दारुड्यांची काळजी – प्रविण दरेकर

मुंबई – राज्य सरकारच्या मंत्रीमंडळाचा निर्णय अत्यंत दुर्दैवी असून या सरकारला फक्त दारुड्यांची काळजी आहे. उद्याची पिढी बरबाद होईल याची त्यांना पर्वा नाही. शेतकऱ्यांच्या भल्याच्या नावावर सुपर मार्केटमध्ये वाइन विकण्याचा व्यभिचार एका अर्थाने हे सरकार करत आहे. शुद्धीवर नसलेल्या सरकारचा हा एक भरकटलेला निर्णय आहे, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी राज्यसरकारच्या सुपर मार्केटमध्ये वाईनची विक्री बाबतच्या निर्णयावर दिली आहे.

दरम्यान, राज्यातील सुपरमार्केटमध्ये आता वाईनची विक्री करता येणार आहे. या संदर्भात आज झालेल्या राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे.

एक हजार स्केअर फुटाच्या सुपर मार्केटमध्ये वाईनची विक्री करता येऊ शकेल. सुपर मार्केट, वॉकिंग स्टोअरमध्ये वाईनच्या विक्रीला परवानगी देण्याबाबत प्रस्ताव आला होता. त्यावर हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी यासंबंधीची माहिती दिली.

आणखी संबंधित बातम्या

Devendra Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीसांची उदय सामंतांना मोठी ऑफर; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

2026-07-05 16:42:05

Devendra Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीसांची उदय सामंतांना मोठी ऑफर; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Pravin Darekar : मोठी घडामोड..! प्रवीण दरेकर सहकार मंत्री होणार? चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याने खळबळ

2026-04-17 18:25:09

Pravin Darekar : मोठी घडामोड..! प्रवीण दरेकर सहकार मंत्री होणार? चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याने खळबळ

Delhi air pollution : दिल्लीकरांना वर्क फ्रॉम होम.! वायू प्रदुषणात वाढ झाल्‍याने सरकारचा निर्णय

2025-12-18 22:02:34

Delhi air pollution : दिल्लीकरांना वर्क फ्रॉम होम.! वायू प्रदुषणात वाढ झाल्‍याने सरकारचा निर्णय

भारत-चीन व्यापारात मोठा बदल! तणावानंतर आता चिनी आयातीला ‘ग्रीन सिग्नल’, या वस्तू येणार

2025-11-04 22:25:37

भारत-चीन व्यापारात मोठा बदल! तणावानंतर आता चिनी आयातीला ‘ग्रीन सिग्नल’, या वस्तू येणार

Pravin Darekar : प्रवीण दरेकरांसह 3 आमदार लिफ्टमध्ये अडकले; 20 मिनिटांनी झाली सुटका

2025-07-20 22:23:21

Pravin Darekar : प्रवीण दरेकरांसह 3 आमदार लिफ्टमध्ये अडकले; 20 मिनिटांनी झाली सुटका