Laxman hake | ओबीसी आंदोलनाचे नेते लक्ष्मण हाके यांचे निकटवर्तीय सहकारी पवन कंवर यांच्यासह तिघांवर हल्ला करण्यात आला आहे. यात पवन कंवर हे गंभीर जखमी झाले आहेत, तर त्यांचे साथीदार किरकोळ जखमी झाले आहे. त्यांच्यावर माजलगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मण हाके यांचे सहकारी पवन कंवर हे त्यांच्या इतर साथीदारांसोबत सावरगावजळील एका ढाब्यावर जेवण करण्यासाठी थांबले होते. त्याच वेळी ३५-४० तरुणांनी त्यांच्यावर लाथा बुक्क्या आणि काठ्यांनी हल्ला केला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल होत जखमींना माजलगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. या बेदम मारहाणीत पवन कंवर गंभीर जखमी झाले. त्यांच्या डोक्याला, पायाला आणि हातालाही इजा झाली आहे. पवन कंवर यांना हाकेंचे विश्वासू सहकारी म्हणूनही ओळखले जाते. Laxman hake| हल्लेखोर फरार दरम्यान, हल्ला केल्यानंतर सर्व हल्लेखोर फरार झाले असून पोलिसांनी या प्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच आरोपींचा शोध घेतला जात आहे. ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांच्या कारला आग लावल्याच्या घटनेनंतर बीड जिल्ह्यात घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे. Laxman hake | नवनाथ वाघमारे यांच्या घरासमोरील कार पेटवली दोन दिवसापूर्वी ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांच्या घरासमोर उभी असलेली स्कार्पिओ डिझेल टाकून जाळल्याची घटना समोर आली होती. पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करुन सीसीटीव्हीच्या आधारे शोध सुरू केला. त्यानंतर फरार असलेल्या विश्वंभर तिरुखे याला अंबड चौफुली येथे जालना पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी तिरुखे याने गुन्ह्याची कबुली दिली असून पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्याचा जामीन मंजूर केला. Laxman hake | हेही वाचा : CWC च्या बैठकीत बिहारच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? ; कोण किती जागांवर निवडणूक लढवणार, वाचा सविस्तर