“एकतर्फी हल्ला करणे हे युद्धाचे कृत्य”; मादुरो यांच्या अटकेवरून न्यूयॉर्कचे महापौर ममदानी भडकले

US Venezuela action | अमेरिकेने व्हेनेझुएलामध्ये बॉम्ब हल्ले करून व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नीला ताब्यात घेतले. अमेरिकेच्या या कारवाईने संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. अनेक देशांनी अमेरिकेच्या या कृतीवर हल्लाबोल केला आहे.
यातच आता न्यूयॉर्कचे नवनिर्वाचित महापौर जोहरान ममदानी यांनी या कारवाईवर तीव्र आक्षेप घेतला आहे. ममदानी यांनी ही कारवाई म्हणजे युद्धाचे कृत्य असल्याचे म्हटले असून, कोणत्याही सार्वभौम देशावर असा एकतर्फी हल्ला चुकीचा असल्याचे म्हंटले.
काय म्हणाले न्यूयॉर्केचे नवे महापौर ममदानी? –
“एका सार्वभौम देशावर एकतर्फी हल्ला करणे हे युद्धाचे कृत्य आहे. हे सार्वभौमत्वाचे व आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन आहे. कुठल्याही सार्वभौम देशावर असा प्रकारची एकतर्फी सैन्य कारवाई युद्धाचे कृत्य मानले जाते आणि याचा परिणाम न्यूयॉर्क सारख्या बहुसांस्कृतिक शहरवरी पडतो. सत्तेत बदल घडवून आणण्याचा हा प्रयत्न आहे. याचा केवळ आंतरराष्ट्रीयच नव्हे तर न्यूयॉर्कमधील जनतेवरही परिणाम होतो. न्यूयॉर्क हे बहुसांस्कृतिक शहर आहे. येथील प्रत्येक नागरिकाची सुरक्षितता ही आपली प्राथमिक जबाबदारी आहे,” असे ममदानी म्हणाले. US Venezuela action |
I was briefed this morning on the U.S. military capture of Venezuelan President Nicolás Maduro and his wife, as well as their planned imprisonment in federal custody here in New York City.
Unilaterally attacking a sovereign nation is an act of war and a violation of federal and…
— Mayor Zohran Kwame Mamdani (@NYCMayor) January 3, 2026
कारकासमधील हवाई हल्ल्यात ४० जणांचा मृत्यू
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ३ जानेवारी रोजी ‘ऑपरेशन अॅब्सोल्यूट रिझॉल्व्ह’ अंतर्गत व्हेनेझुएलावर मोठी कारवाई केली. राजधानी काराकसमध्ये पहाटेच्या सुमारास मोठे बॉम्बस्फोट झाले कारकासमध्ये झालेल्या या हवाई हल्ल्यात किमान ४० जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान, अमेरिकेच्या या कारवाईचे रशिया, चीन आणि इराण यांसारख्या देशांनी निषेध केला आहे. US Venezuela action |
अमेरिकेत ड्रग्जची तस्करी केल्याच्या आरोपाखाली मादुरो यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाण्याचे संकेत ट्रम्प प्रशासनाने दिले आहेत. ट्रम्प प्रशासनाने केलेल्या लष्करी कारवाईवरून व्हेनेझुएलाने अमेरिकेच्या ट्रम्प यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर जोरदार टीका केली आहे आणि त्यांच्यावर अत्यंत गंभीर लष्करी आक्रमकता केल्याचा आरोप केला आहे.
हेही वाचा :
“काही दिवसांत राजकीय बॅाम्ब फुटणार”; भाजपच्या बड्या नेत्याचं सर्वांत मोठं विधान





