कराड -मुंढे, ता. कराड गावाला शुध्द आणि 24 तास पाणी देण्याच्या प्रयत्नाला ग्रामपंचायतीस यश आले आहे. येथील जलस्वराज्य योजनेच्या टप्पा क्रमांक 2च्या 24 बाय 7 नळ पाणीपुरवठा योजनेचे उद्घाटन भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांच्या हस्ते व आ. आनंदराव पाटील, विजय पाटील, जयंत पाटील, सुनील पाटील, आनंदराव जमाले, पैलवान तुकाराम घोडके, सरपंच रमेश लवटे, उपसरपंच भिमराव जमाले, यांच्यासह पदाधिकारी यांच्या उपस्थितीत पार पडले.
या योजनेला दि. 24 जून 2017 रोजी तांत्रिक मान्यता मिळवण्यात सरपंच रमेश लवटे व त्यांच्या टीमला यश आले. त्यानंतर दि. 31 जून 2017 रोजी योजनेला प्रशासकीय मान्यता घेऊन प्रत्यक्ष कामकाजाला सुरूवात झाली. सुमोर साडेआठ कोटी रूपयांच्या या योजनेत 1 लाख 65 हजार लिटर क्षमतेच्या दोन टाक्या आहेत. संपूर्ण गावाला 17 किलोमीटर पाईपलाईन करण्यात आली असून योजनेत शुध्दीकरण प्रकल्पासह मोफत पाणीमीटर दिले जाणार आहेत.
या योजनेचा शुभारंभ येथील भिरूदेव मंदिर परिसरात सामाजिक अंतर ठेवून पार पडला. यावेळी माजी सरपंच अलका साळवे, ग्रामपंचायत सदस्य सागर पाटील, सयाजी जमाले, मुहमंद आवटे, संभाजी साळवे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.