बावधन, दि. 28 –“महिला नियोजनामध्ये परफेक्ट असतात. सासर-माहेर सांभळताना येणाऱ्या अनेक अडचणींवर मात करताना त्या स्वत:साठी जगणेच विसरून गेलेल्या असतात. अभिजीत आणि अश्विनी दगडे पाटील यांनी आयोजित केलेल्या खेळ पैठणीचा कार्यक्रमामुळे महिलांना स्वत:साठी जगता आले. त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य खऱ्या अर्थाने जगण्याला बळ देते आणि हाच आशीर्वाद लाखमोलाचा असतो, असा भावना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी व्यक्त केले.
विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अभिजीत आणि अश्विनी दगडे पाटील यांनी बावधन, पाषाण, सुतारवाडी, सोमेश्वरवाडी भागातील महिलांसाठी “न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणीचा’ कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, आमदार सुनील शेळके यांच्या पत्नी सारिका शेळके, जिल्हा परिषद सदस्य शंकर मांडेकर, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष सविता दगडे पाटील, माजी नगरसेवक प्रमोद निम्हण, रोहिनी चिमटे, रुपाली पाटील, सुषमा निम्हण, राष्ट्रवादी युवक अध्यक्ष किशोर कांबळे, महेश हांडे, युवती अध्यक्ष सुषमा सातपुते, तळेगावच्या नगरसेविका संगीता शेळके, ज्योती सूर्यवंशी, गिरीश गुरूनानी, बालम सुतार, योगेश सुतार यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि परिसरातील महिला उपस्थित होत्या.
जगताप म्हणाले, ही गर्दी आणि महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता, येथून राष्ट्रवादी कॉंग्रेस नक्कीच विजयी मिळवेल असा विश्वास आहे. सारिका शेळके म्हणाल्या, “अभिजीत आणि अश्विनी दगडे यांनी महिलांना हक्काचे व्यासपीठ मिळवून दिले. करोनामुळे घरातच असलेल्या महिलांना या कार्यक्रमानिमित्त एकत्र येऊन मनमुराद आनंद घेता आला.
विजेत्यांची नावे
स्कुटी विजेत्या : सविता शरद तांदळे (बावधन) आणि लक्ष्मी अशोक चव्हाण (सुतारवाडी)
खेळ पैठणीच्या कार्यक्रमातील विजेत्या : धनश्री गायकवाड, प्रियांका गायकवाड, भाग्यश्री साखरे, ममता कोठाले, काजल अवचरे, शुभांगी खंदारे, मयुरी तोडकर.