Toxic Teaser : अभिनेता यश त्याचा ३९ वा वाढदिवस साजरा करत असून त्याने आजच्या दिवशी आपल्या चाहत्यांना खास सरप्राईज दिले आहे. टॅाक्सिक या बहुचर्चित चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातील थरकाप उडवणारा यशचा लूक समोर आला असून, त्याच्या चित्रपटातील धमाकेदार एन्ट्रीने चाहत्यांना थक्क केले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून टॅाक्सिक चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु होती. केजीफ या चित्रपटाने अभिनेता यशला प्रसिद्धीच्या झोतात आणले. या चित्रपटामुळे यशचे आयुष्य पूर्णपणे बदले. केजीफच्या दुसऱ्या भागालाही प्रक्षेकांनी चांगला प्रतिसाद दिला. या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाचे चाहते आतुरतेने वाट पाहत असून, अशातच यशच्या टॅाक्सिक या चित्रपटाचा धमाकेदार टीझर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाच्या टीझरला अवघ्या 2 तसांत तब्बल 28 लक्ष 48 हजारपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. यावरूनच चाहते यशच्या चित्रपटासाठी किती वेड आहेत हे लक्षात येते. आता सोशल मीडियावर अशी चर्चा सुरू झाली आहे की हा चित्रपट धुरंधर चित्रपटाला टफ फाईट देऊन पुढे जाईल. या चित्रपटाचे दिग्दर्शन गीतू मोहनदास यांनी केले आहे आणि यशसोबत त्याने सहलेखन केले आहे. या चित्रपटासोबत यशचा रामायण हा एक मोठा चित्रपट अॅानफ्लोअर आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच टॅाक्सिकमधील अभिनेत्री कियारा अडवाणी आणि अभिनेत्री हुमा कुरेशी तसेच अभिनेत्री नयनतारा आणि रुक्मिणी वसंत यांचे फर्स्ट लूक समोर आले होते. आता चित्रपटाच्या टीझरमध्ये यशच्या लूकने चाहत्यांच्या लक्ष वेधून घेतले आहे. हा चित्रपट १९ मार्च २०२६ रोजी देशभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. हेही वाचा : IPAC कंपनीवर ED चा छापा! IPAC प्रमुख प्रतीक जैन नेमके कोण आहेत? ; कंपनीत ममता बॅनर्जींचाही सहभाग