Ashok Chavan : महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजल्यानंतर राज्यात अनेक मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. या निवडणुकीच्या काळातच काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला असून, लातूर जिल्ह्यातील मोठं नाव विधानपरिषदेच्या आमदार डॅा. प्रज्ञा सातव यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यांनी आज १८ डिसेंबर रोजी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा विधीमंडळ सचिवांकडे सादर केला आहे. हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे. आजच त्यांचा भाजप पक्ष प्रवेश पार पडणार असल्याचे बोलले जात आहे. काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीमुळे काँग्रेस सोडण्याचा निर्णय त्यांनी घेतला असल्याची माहिती समोर आली आहे. अशातच त्यांना भाजपमध्ये येण्यासाठी माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते अशोक चव्हाण यांचा हात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली असून यावर स्वतः चव्हाण यांनी खुलासा केला आहे. माझा त्यांच्या अपेक्षित असलेल्या पक्ष प्रवेशामागे कोणताही हात नाही. माझा यामध्ये काहीही रोल नाही. माझा आणि त्यांचा अनेक दिवसांमध्ये संवाद झालेला नाही, असा खुलासा अशोक चव्हाण यांनी केला आहे. तसेच चव्हाण यांनी काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीवर भाष्य केले. अनेकांना काँग्रेस पक्षामध्ये आपले भवितव्य सुरक्षित वाटत नाही. काँग्रेसमध्ये आम्ही निष्ठेने काम करत होतो; पण काँग्रेस महाराष्ट्रामध्ये नेतृत्वहीन झालेला आहे. त्यामुळे अनेकांना आपल्या आणि पक्षाच्या भविष्याची शाश्वती वाटत नाही. त्यामुळे लोकं आता फार काँग्रेसमध्ये टीकण्याच्या मनस्थितीत नाही, असे चव्हाण म्हणाले. ….तर हे घडलचं नसतं प्रत्येक जिल्ह्यात परिस्थिती वेगवेगळी आहे. परंतु, जिथे निवडणुकीचा प्रश्न येतो तिथे मिरिट पाहावे लागते. काम करणारे मागे राहतात आणि काम न करणारे पुढे येतात. यामुळे वाद निर्माण होतात. स्पष्ट संदेश देत नेतृत्वाने लक्ष दिले असते तर काँग्रेसमध्ये हे घडलंच नसतं, असे स्पष्ट मत माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले. हेही वाचा : शेख हसीना यांच्या मुलाचा भारताला इशारा; म्हणाले “चिंतेची बाब, दहशतवाद पुन्हा सुरू होण्याची शक्यता”