Ganesh Naik : राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून, १५ जानेवारी २०२६ ला मतदान तर १६ जानेवारी २०२६ रोजी निकाल जाहीर केला जाणार आहे. त्याअनुषंगाने सर्वच महापालिकांसाठी राजकीय पक्षांकडून रणनिती आखली जात आहे. भारतीय जनता पार्टीने देखील या निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी २० जणांच्या दिग्गज नेत्यांची टीम पक्षाने मैदानात उतरवली आहे. यावरूच स्पष्ट होते की या भाजप निवडणुकीसाठी मॅाक्रो प्लॅनिंग करत आहे. मुंबई महापालिकेसाठी २२७ प्रभागांसाठी १५० जागांचा तिढा भाजप-शिवेसनेच्या बैठकीत सुटला आहे. उर्वरित जागांवरचा तिढा सोडविण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. अशातच मुंबईलाच लागून असलेल्या नवी मुंबई महापालिकेसाठी भाजप मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. नवी मुंबई महापालिकेची निवडणूक भाजप स्वबळावर लढणार असल्याची शक्यता आहे. तशा हालचाली सुरू झाल्या आहेत. ठरल्याप्रमाणे गोष्टी झाल्या तर भाजप हा निर्णय घेऊ शकतो. भाजपचे नेते वनमंत्री गणेश नाईक यांनी नवी मुंबईत भाजपाच महापौर बसवू आणि ७० हून अधिक जागा जिंकू असा निर्धार केला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना तसा शब्द दिला आहे. यासंदर्भात भाजपची महत्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत कोणता निर्णय घेतला जणार याकडे लक्ष असणार आहे. निर्णयाकडे लक्ष गणेश नाईक यांनी आपली भूमिका उघड केली आहे. ७० पेक्षा अधिक नगरसेवक निवडून आणू, असा दावा त्यांनी केला आहे. तसेच त्यांनी भाजपाने स्वबळावर लढण्यासाठी भाजपच्या नेतृत्वाला तसे सांगितले आहे. पण स्थानिक परिस्थिती नेमकी पूरक आहे क? कशा पद्धतीने रणनिती आखली केली जाऊ शकते हेही तितकेच महत्वाचे असणार आहे. त्यामुळे या संदर्भातील अंतिम निर्णय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि भाजप निवडणूक प्रमुख माजी खासदार संजीव नाईक यांच्यातील बैठकीत घेतला जाणार आहे. त्यामुळे गणेश नाईक यांनी व्यक्त केलेल्या भूमिकेसंदर्भात पक्षाचे नेते बैठकीत काय निर्णय घेतात याकडे लक्ष असणार आहे. हेही वाचा : Revenue Officers Strike: महसूल अधिकाऱ्यांचे राज्यव्यापी आंदोलन स्थगित; शासनाकडून सकारात्मक प्रतिसाद