Sachin Sawant : देशाचे लक्ष लागून राहिलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत अखेर भाजप आणि शिवसेना (शिंदे) अर्थात महायुतीच्या सर्वाधिक जागा जिंकून आल्या आहेत. भाजप आणि शिवसेना (शिंदे) पक्षाने युती करून मुंबई महापालिकेची निवडणूक लढवली होती. २२७ प्रभागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपला ८९ जागा मिळाल्या आहेत. तर शिवसेना (शिंदे) पक्षाला २९ जागा मिळाल्या आहेत. या निवडणुकीत पुन्हा एकदा महाविकास आघाडी बॅकफुटवर गेल्याचे चित्र आहे. निवडणुकीच्या निकालानंतर मुंबई महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘महाविकास आघाडी एकत्रित असती तर आज मुंबई महापालिकेत सत्ता असती’, असे मोठं विधान त्यांनी केले आहे. तसेच सावंत यांनी मोठा खुलासा करत महाविकास आघाडी एकत्र न येण्याचे खापर मित्र पक्षांवर फोडले आहे. मुंबई महापालिकेचा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर काही दिवसांतच काँग्रेस पक्षाने आपली भूमिका स्पष्ट करत स्वतंत्र निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे जाहीर केले. महाविकास आघाडी एकत्र येण्याची चर्चा झाली. पण यश आले नसल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जाते. या निवडणुकीत काँग्रेसने वंचित आघाडीला सोबत घेऊन १५२ जागा लढवल्या. त्यापैकी केवळ २४ जागांवर पक्षाला समाधान मानावे लागले आहे. गेल्या निवडणुकीत ३१ जागा काँग्रेसच्या होत्या. या निवडणुकीत काँग्रेसच्या जागा घडल्याचे दिसते. नेमकं काय म्हणाले सचिन सावंत? “सगळ्यांनी एकत्र येणे गरजेजे होते. पण प्रत्येक पार्टीला एक त्यांची स्वंतत्र विचारधारा असते, त्यामुळे आमची भूमिका हीच राहिली आहे की, आम्ही महाविकास आघाडीच्या साथीने निवडणुकाला सामोरे गेलो असतो तर चांगले झाले असते. पण त्या प्रकारची चर्चा आमच्या मित्रपक्षांची सुरूवातीपासूनच नव्हती.” मुंबईत महापालिकेत ठाकरे बंधूंचा फॅक्टर महायुतीसमोर आव्हान उभे करून शकेल असे वाटत होते. मात्र, निकालानंतर शिवसेना ठाकरे गटाला ६५ जागा मिळाल्या आहेत. तर मनसेला ६ जागांवर समाधान मानावे लागले आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला एक जागा तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला ३ जागा मिळाल्या आहेत. #WATCH | Mumbai: Congress National Secretary Sachin Sawant says, “Had Maha Vikas Aghadi been in its original form, we believe it would have been MVA in power in BMC. Our State president was saying again and again that the original MVA should have carried forward. Every party has… pic.twitter.com/U8Lv0BVxv3 — ANI (@ANI) January 17, 2026 हेही वाचा : “आता मी पुण्याच्या मैदानात स्वतः उतरणार”!, zp निवडणुकीत अजित पवारांना खो…वाचा टॉप १० बातम्या एका क्लिकवर