दरम्यान, भारतात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा करून फरार झालेले हे दोन दिग्गज परदेशात अशा प्रकारे आलिशान जीवन जगत असल्याचे पाहून भारतीय नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. “बँकांचे पैसे बुडवून हे लोक परदेशात मौजमजा करत आहेत,” अशा आशयाच्या कमेंट्सचा पाऊस पडत आहे. सोशल मीडियावर या दोघांनाही मोठ्या प्रमाणावर ‘ट्रोल’ केले जात आहे.
\nललित मोदीकडून आभार प्रदर्शन :
\nललित मोदीने या कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या सर्व मित्रांचे आभार मानले आहेत. त्याने लिहिले, “माझ्या घरी आयोजित केलेल्या माझा मित्र विजय मल्ल्याच्या प्री-बर्थडे पार्टीसाठी आल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार.” असं तो म्हणतो. या व्हिडिओत अनेक बडे लोक असल्याचं दिसत आहे.