हेही वाचा – टी-२० विश्वचषकासाठी तगड्या संघाची घोषणा! ४२ वर्षीय खेळाडू बनला कर्णधार; जसप्रीतलाही मिळाली संधी
\nशेवटच्या षटकांत अमेलिया केर (नाबाद ४९) आणि अमनजोत कौर (४१) यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत सामना मुंबईच्या हातातून निसटला होता. मुंबईचा संघ २० षटकांत ६ बाद १६५ धावांपर्यंतच मजल मारू शकला. यूपीसाठी शिखा पांडेने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या.
\n\nयूपी वॉरियर्सने सलग दुसऱ्यांदा मुंबईला चारली धूळ –
\n\n\n1⃣1⃣9⃣ runs off 74 deliveries 🙌
\nMeg Lanning and Phoebe Litchfield smashed #UPW‘s 2️⃣nd highest #TATAWPL partnership 🙇♀️
\nUpdates ▶️ https://t.co/7bDWCP77Em #KhelEmotionKa | #UPWvMI | @UPWarriorz pic.twitter.com/X488427lKC
\n— Women’s Premier League (WPL) (@wplt20) January 17, 2026
\nविशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वी (१५ जानेवारी) झालेल्या सामन्यातही यूपी वॉरियर्सने मुंबईला ७ गडी राखून हरवले होते. सलग दोन विजयांसह यूपीने गुणतालिकेत आपली स्थिती मजबूत केली आहे, तर मुंबईला आपल्या रणनीतीवर पुन्हा विचार करण्याची वेळ आली आहे.