नागपूर – नागपूर येथील वनविभागाने हिंगणा परिसराजवळ बिबट्याची शिकार केल्याप्रकरणी तीन जणांना अटक केली आहे. नागपूर विभागाच्या उपवनसंरक्षक विनिता व्यास यांनी सांगितले की, ९ डिसेंबर रोजी हिंगणा येथील मौजा भिवकुंड येथे एका बिबट्याची शिकार करण्यात आली होती. या शिकारीत कथितरित्या सामील असलेल्या तीन जणांना भिवकुंड, बुटीबोरी आणि भिवपूर येथून अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली शस्त्रेही जप्त करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या तिघांना १० डिसेंबर रोजी न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्यांना तीन दिवसांसाठी वनविभागाच्या कोठडीत पाठवले आहे.