मुंबई : राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी मारत वर्चस्व कायम राखले आहे. मात्र, या निवडणुकीत मतदारांनी घराणेशाही राबवणाऱ्या उमेदवारांना मोठा धडा शिकवला आहे. अनेक नेत्यांनी कुटुंबीयांना उमेदवारी दिली होती, पण जनतेने ती स्पष्टपणे नाकारली. तब्बल २९ नेत्यांच्या नातेवाइकांना पराभवाची नामुष्की ओढवली असून, ‘काही खुशी, काही गम’ अशी स्थिती निर्माण झाली आहे. राज्यात आमदारकी-खासदारकीसह स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एकाच कुटुंबाचे वर्चस्व असते. यावेळी मंत्र्यांच्या पत्नी, मुली, सून, भाऊ, मुलगा अशा नातेवाइकांना उमेदवारीची ‘खैरात’ वाटली गेली. मात्र, मतदारराजाने घराणेशाहीला ठोस सुरुंग लावला आहे. घराणेशाही नाकारलेल्या पराभूत उमेदवारांची यादी: अ.क्र. मतदार संघ पराभूत उमेदवार पक्ष नातं 1 भुसावळ रजनी सावकारे भाजप मंत्री संजय सावकारे यांची पत्नी 2 पंढरपूर श्यामल शिरसाट भाजप माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट यांच्या पत्नी 3 देवळी (वर्धा) शोभा तडस भाजप माजी खासदार रामदास तडस यांची पत्नी 4 अकोट रजिया खतीब आघाडी माजी आमदार खतीब यांची पत्नी 5 बुलढाणा अर्पिता शिंदे भाजप माजी आमदार विजयराज शिंदे यांच्या पत्नी 6 श्रीरामपूर अनुराधा आदिक राष्ट्रवादी वडील गोविंदराव आदिक माजी मंत्री व प्रदेशाध्यक्ष 7 चाळीसगाव पद्मजा देशमुख स्थानिक आघाडी माजी आमदार राजीव देशमुख यांच्या पत्नी 8 पाचोरा सुचेता वाघ भाजप आमदार दिलीप वाघ यांच्या पत्नी 9 अंजनगाव सुर्जी यश लवटे शिवसेना उबाठा आमदार गजानन लवटे यांचा मुलगा 10 भंडारा डॉ आश्विनी भोंडेकर शिवसेना आमदार नरेंद्र भोंडेकर यांची पत्नी 11 तुमसर कल्याणी भुरे शिवसेना माजी आमदार डायगव्हाणे यांची मुलगी 12 लोहा गजानन सूर्यवंशी भाजप एकाच कुटुंबात 6 उमेदवार 13 बदलापूर वामन म्हात्रे शिवसेना एकाच कुटुंबातील 4 उमेदवार 14 यवतमाळ प्रियंका मोघे कॉंग्रेस माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांची सून 15 बार्शी निर्मला बारबोले शिवसेना उबाठा माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले यांची पत्नी 16 करमाळा सुनीता देवी भाजप 27 वर्ष नगराध्यक्ष राहिलेल्या गिरधर दासदेवी यांची सून 17 दर्यापूर नलिनी भारसाकळे भाजप अकोटचे आमदार प्रकाश भारसाकळे यांची पत्नी 18 पारोळा अंजली पवार शिवसेना उबाठा माजी नगराध्यक्ष करण पवार यांची पत्नी 19 पेठ वडगाव प्रणिता सालपे जनसुराज्य माजी नगराध्यक्ष कुटुंबातील 20 आजरा अशोक सराटी(आघाडी) माजी नगराध्यक्ष कुटुंबातील अशोक सराटी आघाडी माजी नगराध्यक्ष कुटुंबातील 21 पाथरी जुनेदखान दुर्गानी कॉंग्रेस वडील बाबा दुर्गानी माजी आमदार 22 वाशिम नितेश मलिक भाजप माजी आमदार लखन यांचे पुत्र 23 वाशिम सीमा राजगुरू भाजप माजी आमदार पुरुषोत्तम राजगुरू यांची पत्नी 24 मुर्तीजापुर भूपेंद्र पिंपळे भाजप आमदार हरीश पिंपळे यांचा भाऊ 25 रत्नागिरी शिवानी सावंत शिवसेना उबाठा माजी आमदार सुरेंद्र माने यांची सून 26 गडहिंग्लज स्वाती कोरे जनता दल माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांची मुलगी 27 मुरगूड तसनीम जमादार राष्ट्रवादी शरद पवार माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार यांची पत्नी 28 संगमनेर सुवर्णा खताळ शिवसेना उबाठा आमदार अमोल खताळ यांची वहिनी 29 फलटण अनिकेत निंबाळकर राष्ट्रवादी शरद पवार माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांचे भाऊ