Grand Alliance : राज्यातील २९ महापालिकांचे निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. महायुतीने पुन्हा एकदा जोरदार मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. सगळ्यांचे लक्ष लागून असलेल्या सर्वात मोठ्या आणि श्रीमंत महापालिका अर्थात मुंबई महापालिकेसाठी जागावाटपारून मोठी रस्सीखेच सुरु असून लवकरच अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. दुसरीकडे उपराजधानी नागपूरसह विदर्भातील महत्वाच्या काही महापालिकांसाठी एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला असून त्यावर शिक्कामोर्तेब झाला आहे. नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे होमपीचवर अर्थात उपराजधानी नागपूरमध्ये महायुतीला चांगले यश मिळाले आहे. आता वेध आहेत ते महापालिका निवडणुकांचे. त्यामुळे महायुतीचा बैठकांचा सैलसिला सुरू असून निर्णय अंतिम केले जात आहे. त्याच अनुषंगाने नागपुरात विदर्भातील युती संदर्भात एक महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत विदर्भातील चार महापालिका महायुती म्हणून लढणार आहे. यामध्ये नागपूर, अमरावती, चंद्रपूर आणि अकोला या चार महापालिकांचा समावेश आहे. या चारही महापालिकांमध्ये भाजप आणि शिवसेना महायुती करत निवडणूक लढवणार आहे. तर चंद्रपूर आणि अकोल्यामध्ये महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेसचाही समावेश असणार आहे. नागपूर आणि अमरावतीत राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र निवडणुकीला सामोरे जाईल, अशी माहिती आहे. नागपुरात गुरुवारी भाजप आणि शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत विदर्भातील चार महापालिकांसाठी निर्णय अंतिम करण्यात आला आहे. दरम्यान, कोणता पक्ष किती जागा लढवेल याबाबत माहिती समोर आलेली नाही. भाजप नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे विदर्भाच्या दौऱ्यावर आले असताना नागपुरात भाजपच्या विदर्भ कार्यालयात चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली महत्वाची बैठक पार पडली. तर दुसरीकडे शिवसेना नेते उद्योगमंत्री उदय सामंत आणि संजय राठोड यांच्या उपस्थित शिवसेनेच्या नागपूर, अमरावती अकोला आणि चंद्रपूर शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक हॉटेल सेंटर पॉईंटमध्ये आयोजित करण्यात आली होती. महापालिका निवडणुकीसाठी महायुतीकडून जोरदार तयारी केली जात असल्याचे दिसत आहे. हेही वाचा : जागावाटपावरून खलबतं! पुणे, पिपरी-चिंचवड महापालिकांसाठी दोन्ही राष्ट्रवादीची गुप्त बैठक; पुढचे दोन दिवस महत्वाचे