Nilesh Rane : ऐन थंडीच्या दिवसांमध्ये मुंबईतील पारा राजकारणामुळे चांगलाच तापला आहे. येत्या काही दिवसांवर पालिका निवडणूक येऊन ठेपलेली आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे मैदानात उतरले आहेत. मुंबईसाठी भाजप आणि शिवसेना शिंदे पक्षाने देखील कंबर कसली असून, रणनिती आखण्यात आली आहे. शिवसेना शिंदे यांच्या पक्षाने मुंबई महापालिकेसाठी दिग्गज नेत्यांवर प्रचाराची धुरा सोपवली आहे. त्यानुसार शिंदेंचे कोकणातील विश्वासू शिलेदार आमदार निलेश राणे मुंबईत ठिकठिकाणी दौरे करताना दिसत आहे. अशातच एका दौऱ्यात निलेश राणे यांनी ठाकरे बंधूंवर टीकास्त्र डागले आहे. ‘ठाकरे ब्रँड फक्त बाळासाहेब होते, आता सगळे संपलेत’, अशी जहरी टीका त्यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. तसेच ठाकरे बंधूंची एक्स्पायरी डेट जवळ आली आहे, असे देखील निलेश राणे यांनी म्हटले आहे. मुंबईत ठाकरेंनी कसे आणि कती पैसे खाल्ले हे सगळे काढणार, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे. आमदार निलेश राणे हे शिवडी येथील उमेदवारांच्या प्रचारार्थ आले असताना त्यांनी वरील विधान केले आहे. “शिवडी मतदार संघातील परिस्थिती बघा, हा बालेकिल्ला म्हणता ना तुम्ही? काय स्टँन्डेड अॅाफ लिव्हिंग आहे इकडे, ज्या इमारत्या झाल्या त्याचे श्रेय राजकीय पक्षाचे नाही. तुम्ही व्यवस्था काय उभे केली?” असा सवाल निलेश राणे यांनी उपस्थित केला आहे. पुढे ते म्हणाले, “ज्या १८ नागरी सुविधा असतात, त्यापैकी तुम्ही किती दिल्या आणि स्वताहून किती उभ्या राहिल्या, शिवडीने आपल्याला भरभरून दिले पण आपण शिवडीला काय दिले? असे देखील निलेश राणे म्हणाले आहेत. उद्धव ठाकरेंना खोचक टोला सध्या पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे शाखाभेटीतून लोकांचे लक्ष वेधून घेत आहेत. यावर भाष्य करताना निलेश राणे म्हणाले, आता रस्त्यावरून येऊन उद्धव साहेबांनी फार उशिरा केला. आता त्यांना रस्त्यावर उतरावं लागलं, कारण ही परिस्थिती जनतेने त्यांच्यावर आणली आहे. ते स्वतः च्या मर्जीने रस्त्यावर उतरलेले नाहीत. याचे आत्मपरिक्षण त्यांनीची केले तर चांगलं होईल, असा खोचक टोला नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. हेही वाचा : Reena Roy: पडद्यावरील पहिली ‘नागिन’ जिने प्रेक्षकांची मने जिंकली