Vasant More post : पुणे महापालिका निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपने आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. १६५ प्रभाग रचना असलेल्या पुणे महापालिकेत तब्बल ११९ जागांवर भाजपचे उमेदवारांनी विजय मिळवला आहे. या विजयात केंद्रीय मंत्री भाजप नेते आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांचा मोलाचा वाटा असल्याचे सांगितले जाते. तर दुसरीकडे इतर पक्षांची अवस्था बिकट बनली असल्याचे चित्र आहे. पुण्यातील राजकारणात वसंत मोरे कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. महापालिका निवडणुकीत त्यांना पराभवाचा धक्का बसला असून, निकालानंतर वसंत मोरे यांनी सोशल मीडिया अकाऊंवरून पोस्ट शेअर केली आहे. पुणे महानगरपालिका पोटनिवडणुकीच्या निकालाने कात्रज परिसरातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलून टाकली आहेत. ठाकरे गटाचे आक्रमक नेते म्हणून वसंत मोरे यांची ओळख आहे. त्यांचा भारतीय जनता पार्टीचे उमेदवार व्यंकोजी खोपडे यांनी 1100 मताधिक्क्यांनी पराभव केला आहे. आता पराभवानंतर वसंत मोरे यांनी त्यांच्या सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टमुळे अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत. “कात्रजच्या जनतेने त्यांना जमिनीवर आणलं” असे पोस्टमध्ये वसंत मोरे म्हणाले आहेत. तसेच परिणाम तर भोगावे लागतील ना असेही त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे या पोस्टमधून मोरे यांनी नेमका कुणाला इशारा दिला आहे. याबाबत तर्क वितर्क लढवले जात आहे. पुणे महापालिका निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. चार वर्ष पुणे शहरात कोणतेही पद नसताना 2022 ते 2026 गरीब मायबाप जनतेचा आधार बनून होतो आणि आता तर 20 हजार 867 पीडित, शोषित, प्रमानिक जनतेने आशीर्वाद दिला आहे परिणाम तर भोगावे लागतील ना… pic.twitter.com/xR6XoJNh0o — Vasant More | वसंत मोरे (@vasantmore88) January 17, 2026 नेमकं काय म्हणाले वसंत मोरे? चार वर्ष पुणे शहरात कोणतेही पद नसताना 2022 ते 2026 गरीब मायबाप जनतेचा आधार बनून होतो आणि आता तर 20 हजार 867 पीडित, शोषित, प्रमाणिक जनतेने आशीर्वाद दिला आहे परिणाम तर भोगावे लागतील ना…, असे पोस्टमध्ये वसंत मोरे म्हणाले आहेत. या सोबतच त्यांनी एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे. दरम्यान, दुसरीकडे वसंत मोरे यांचा मुलगा रुपेश मोरे देखील निवडणुकीच्या रिंगणात उभा होता. भाजप उमेदवार रंजना कुंडलिक टिळेकर यांनी प्रभाग क्रमांक 40 (ड) मधून विजय मिळवत रुपेश मोरेला पराभूत केले आहे. या टफ फाईटकडे सगळ्याचे लक्ष होते. मात्र, मतमोजणीच्या दिवशी पहिल्या फेरीपासूनच रुपेश मोरे पिछाडीवर पडल्याने रंजना टिळेकर विजयी झाल्या आहेत. हेही वाचा : पुणे शहरातील उद्या प्रमुख रस्ते वाहतुकीस बंद; शाळा-महाविद्यालयांना सुट्टी