Amit Deshmukh : राज्यात जरी महायुती एकत्र असली तरी स्थानिक निवडणुकीत मात्र विचित्र प्रकाराच्या युत्या आघाड्या झाल्याचे बघायला मिळत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्यातही राजकारण तापले आहे. अहमदपूर नगरपरिषद निवडणुकीत सहकार मंत्री बाबासाहेब पाटील विरूद्ध भाजप आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्यात राजकीय वाद निर्माण झाले असून, या वादात आता काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांनी एंट्री घेतली आहे. महायुतीमधील गोंधळावर त्यांनी थेट भरसभेत भाष्य केले आहे.

सैयारा तू तो बदला नहीं है… मौसम जरा सा रूठा हुआ है” या गाण्याचा उल्लेख आमदार अमित देशमुख यांनी खोचक टीका केली आहे. महायुतीतील कलहावर काँग्रेसने टीकास्त्र डागले असून गद्दारीचा मुद्दा देखील निवडणुकीत अधोरिखेत केला आहे. त्यामुळे येथील राजकारण चांगलेच तापले आहे. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आणि भाजप आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्यात गद्दारीच्या मुद्यावरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. आमदार अमित देशमुख यांनी हाच धाक पकडत थेटपणे भाष्य केले आहे.

अमित देशमुखांचा खोचक टोला

अमित देशमुख यांनी आपल्या भाषणातून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला डिवचले आहे. ज्या पक्षाचं भवितव्यच अंधारात त्या पक्षांच्या भानगडीत मतदाराने पडू नका, असा खोचक टोला देशमुखांनी लगावला आहे. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या चिन्हांवरी सध्या सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. ही चिन्ह त्यांच्या पक्षाकडेच राहतील की नाही, याबाबत शंका आहे. त्यामुळे ज्या ज्या पक्षाचं भवितव्यच अंधारात आहे. त्या पक्षांच्या भानगडीत मतदाराने पडू नका, असा सल्ला काँग्रेस आमदार अमित देशमुख यांनी अहमदपूरकरांना दिला आहे. अमित देशमुख यांनी केलेल्या वक्तव्यावर शिवसेना आणि राष्ट्रावादीकडून काय प्रत्युत्तर दिले जाते हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

हेही वाचा : शिवसेना आणि मनसेची युती होणार? उद्धव ठाकरे ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी राज ठाकरेंच्या भेटीसाठी दाखल