Sayali Sanjeev : मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी राजकारणात एन्ट्री केली आहे. अनेक मराठी कलाकारही अभिनयासोबतच राजकीय क्षेत्रातही वेगवेगळ्या पक्षांसाठी काम करताना दिसतात. पक्षांच्या अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांच्यावर सोपविण्यात आल्या आहेत. अशातच मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रीने एका मुलाखतीत दिलेल्या उत्तरामुळे अभिनेत्री राजकारणात एन्ट्री करणार असल्याची चर्चा रंगली आहे. “मी अजून असं काही ठरवलेलं नाही. मला राजकीय विश्लेषक म्हणून काम करायला खूप आवडेल. मला एखाद्या पक्षात सक्रीय काम करत राहण्यापेक्षा मला संपूर्ण राजकारणाचं विश्लेषण करायला फार मजा येईल”. असे स्पष्ट मत सायली संजीवने बोलताना व्यक्त केले. 2009 पासून मला राजकारणाची गोडी निर्माण झाली आहे. राज साहेबांनी मनसेची स्थापना केली त्यावेळी मी वाढत्या वयात होते. माझ्या वाढत्या वयात मी त्यांची भाषणे ऐकली. त्यामुळे माझ्यावर त्यांचा खूप जास्त प्रभाव पडला असल्याचे देखील अभिनेत्रीने सांगितले. खरंतर अभिनेत्री सायली संजीव ही मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या भूमिकांशी सहमत असल्याचे तिने जाहीरपणे अगोदर दिलेल्या मुलाखतीमधून सांगितले आहे. त्यामुळे सायलीची राजकारणाबाबत असलेले मतं पाहता ती राजकीय क्षेत्रात पाऊल ठेवणार का? हे पाहणे महत्वाचे असणार आहे. या मुलाखतीत सायलीने मराठी भाषेवरही भाष्य केले. “आपल्या भाषेचा, आपल्या संस्कृतीचा आपण मान ठेवला तर बाकीचे लोक मान ठेवतील, असे ती म्हणाली. मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून सायली संजीवकडे पाहिले जाते. कैरी या चित्रपटामुळे ती सध्या चर्चेत असून, हा चित्रपट १२ डिसेंबर २०२५ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. याशिवाय तिने अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे. हेही वाचा : “सरकारकडे फक्त शेतकरी कर्जमाफीला पैसा नाही”; अंबादास दानवेंच्या ‘कॅश बॉम्बचा मोठा धमाका