पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी शुक्रवारी राज्यातील महिलांमध्ये उद्योजकाता वाढविण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेतील 10 लाख महिलांच्या 1 हजार कोटी रुपयांचे वाटप केले. पाचव्यांदा सत्तेत आल्यानंतर नितीशकुमार यांनी मंत्रीमंडळातील सहकारी व उच्चस्तरीय अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये डीबीटी प्रणालीद्वारे प्रत्येक लाभार्थ्यांच्या खात्यांमध्ये 10 हजारांची रक्कम पाठवले. या कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना ग्रामीण विकासमंत्री श्रवणकुमार म्हणाले की, आतापर्यंत एकूण 1.56 कोटी महिलांना पैसे मिळाले आहेत. लाभार्थ्यांना ही रक्कम स्वयंरोजगारासाठी वापरण्यास प्रोत्साहित केले जात आहे. जे लोक असे करतील त्यांना लवकरच प्रत्येकी २ लाख रुपयांची मदत मिळेल. बिहार विधानसभा निवडणूकीच्या एक महिनाआधी पंतप्रधान मोदी यांनी सप्टेंबरमध्ये या योजनेची सुरुवात केली होती. लाभार्थी महिलांना टप्प्या-टप्प्याने पैसे देण्यात येत आहेत. त्यामुळे निवडणूका जाहीर झाल्यानंतरही ही प्रक्रिया सुरु राहिली. त्यामुळे एनडीएवर, हे पैसे मते खरेदी करण्यासाठी वाटले जात असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. महिलांनी अभूतपूर्व संख्येने मतदान केले, त्यामुळे सत्ताधारी एनडीएने लाभार्थ्यांना लांभांश दिला असे देखील विरोधकांकडून म्हटले जात आहे. अर्जदारांकडून मागीतली लाच योजनेत सहभागी होण्यासाठी अर्ज करुनही पैसे न मिळाल्याचे महिलांच्या तक्रारी होत्या. याबरोबरीने अर्ज भरण्यात सहभागी असलेले अनेक अधिकारी लाच मागत असल्याचा आरोप देखील विरोधकांनी केला आहे. या संदर्भात श्रवणकुमार यांना विचारणा करण्यात आली. यावेळी ते सांगितले की, मदत प्राप्त करणाऱ्यांनी त्यांच्या क्षेत्रातील जीविका बचत गटात नोंदणी करावी. ज्यांनी तसे केले नाही त्यांना आवश्यक ते करण्यास प्रवृत्त केले जात आहे आणि त्यांना लाभ मिळेल. या योजनेवर राजद व जनसुराज पक्षांकडून सातत्याने भ्र्ष्टाचाराचे आरोप केले आहेत.