Akhil Chitre’s post : नाशिकमध्ये २०२६ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची जोरदार तयारी केली जात आहे. राज्यासह इतर राज्यातील अनेक साधू संत या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिकमध्ये दाखल होणार आहेत. साधू संताची निवासाची सोय म्हणून तपोवन परिसरात ११५० एकरवर साधूग्राम उभारण्यात येणार असून, यासाठी तपोवन परिसरातील सुमारे १८०० झाडांवर कुऱ्हाड फिरवली जाणार आहे. या निर्णयाला पर्यावरणवादीप्रेमींनी कडाडून विरोध दर्शवला आहे. मोठं जनआंदोलन यासाठी उभारण्यात आले असून, नाशिककर रस्त्यावर उतरले आहे. आता सेलिब्रिटींनी देखील वृक्षतोडीला विरोध दर्शवला आहे. दरम्यान, तपोवनमधील वृक्षतोड प्रकरणावर भाजप नेते व मंत्री नितेश राणे यांनी वादग्रस्त विधान केल्याने तपोवन वृक्षतोडीचा विषय आणखीच चिघळला असून, नव्या वादाला तोंड फुटले आहे. ठाकरेसेनेला त्यांच्या विधानावर बोचरी टीका करत जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. तपोवनमधील वृक्षतोडीची चिंता करणारे पर्यावरणवादी कधीच ईदच्या वेळी बकरी कापण्याला विरोध करताना दिसत नाहीत, असे वादग्रस्त विधान नितेश राणे यांनी एक्सवरून केले होते. त्यांच्या याच विधानाला ठाकरेसेनेच्या शिलेदाराने हल्ला चढवत थेट प्रहार केला आहे. वृक्षतोड हा पर्यावरणाचा विषय आहे धर्माचा नाही. टिल्लू-स्तराची बुद्धी असलेल्याला वृक्षतोडसारखा गंभीर विषय कुठून समजणार? टिल्लू-लेव्हल बुद्धीत वृक्षतोड बसणार तरी कुठे? त्याच्या सिस्टीममध्ये तर हिंदू-मुस्लीम बकरा-कोंबडीच फिरतात,वृक्षतोडची फाईल तर ‘unsupported format’ म्हणूनच उघडत… — Akhil Chitre अखिल चित्रे (@akhil1485) December 5, 2025 ठाकरेंच्या शिलेदाराने घेतला समाचार वृक्षतोड हा पर्यावरणाचा विषय आहे धर्माचा नाही. टिल्लू-स्तराची बुद्धी असलेल्याला वृक्षतोडसारखा गंभीर विषय कुठून समजणार? टिल्लू-लेव्हल बुद्धीत वृक्षतोड बसणार तरी कुठे? त्याच्या सिस्टीममध्ये तर हिंदू-मुस्लीम बकरा-कोंबडीच फिरतात, वृक्षतोडची फाईल तर ‘unsupported format’ म्हणूनच उघडत नाही, अशा बोचऱ्या शब्दांत ठाकरे सेनेचे अखिलेश चित्रे यांनी नितेश राणेंवर टीका केली. नितेश राणे यांनी केलेल्या विधानावर त्यांच्यावर टीकेची झोड उठतात त्यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. ईदमध्ये मोठ्या प्रमाणात बकरींची हत्या होते आणि रक्ताचे पाट वाहत असतात, तेव्हा हे पर्यावरणवादी आवाज उठवताना दिसत नाहीत. व्हर्च्युअल बकरी ईद करा, असं कधीच बोलताना दिसत नाहीत. मग एका धर्माला एक न्याय आणि दुसऱ्या धर्माला दुसरा कशाला, असा प्रश्न मी विचारला आहे, असे ते म्हणाले. झाडं जगली पाहिजेत, हा पर्यावरणाच्या दृष्टीने योग्य मुद्दा आहे. पण जसं झाडाला मिठी मारतात, तसं बकरीला का मिठी मारत नाही? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. हेही वाचा : महापालिकांच्या निवडणुकीची तारीख ठरली? शिंदेंच्या मंत्र्यांने स्पष्टचं सांगितलं म्हणाले…