Raj Thackeray Uddhav Thackeray joint interview : ठाकरे बंधूंची बहूप्रतिक्षित संयुक्त मुलाखतीचा दुसरा भाग आज प्रदर्शित झाला आहे. ही मुलाखत उबाठा गटाचे नेते खासदार संजय राऊत आणि सिनेदिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी घेतली आहे. या स्फोटक मुलाखतीच्या दुसऱ्या भागात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचे काम सुरू असल्याचा आरोप विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर करण्यात येत होता. या आरोपांचे खंडन करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूर्य-चंद्र असेपर्यंत मी मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं होऊ देणार नाही, असे विधान केले होते. या विधानाचा दाखला देत संजय राऊत यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना प्रश्न केला असता ठाकरे बंधूंंनी फडणवीसांवर जोरदार टीका केली. मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचे कारस्थान दिल्लीत सुरू आहे. असे उद्धव ठाकरे म्हणाले. तर राज ठाकरे यांनी वरती जे बसलेले दोघेजण (मोदी-शहा) आहेत त्यांच्या मनात काय आहे हे पहिल्यांदा आपल्याला कळणं गरजेचं आहे आणि ते कळतंय. भाजपलाही एक्सपायरी डेट असल्याचे देखील ठाकरे बंधूंनी सांगितले. नेमकं काय म्हणाले राज ठाकरे? त्यांच्या हातातच मुळात काही नाही. इच्छा चांगली आहे, पण जे ‘वरून’, म्हणजे दिल्लीतून सांगितलं जाणार तेच त्यांना ऐकावं लागणार. ‘वरून’ सांगितलं की ही जमीन अदानीला द्यायची, तर त्यांच्यासमोर सही करण्याशिवाय पर्यायच नसतो. तसेच वरच्यांच्या मनात काय आहे हे जास्त महत्त्वाचं आहे. इकडच्या लोकांच्या मनात काय आहे हा विषयच येत नाही, असे राज ठाकरे म्हणाले. पुढे बोलताना राज ठाकरे यांनी, चंद्र-सूर्याचे कितीही दाखले दिले तरी वरती जे बसलेले दोघेजण (मोदी-शहा) आहेत त्यांच्या मनात काय आहे हे पहिल्यांदा आपल्याला कळणं गरजेचं आहे आणि ते कळतंय, असे देखील राज ठाकरे म्हणाले आहेत. उद्धव ठाकरे काय म्हणाले? मुळात मुंबई महाराष्ट्रापासून कोणीही तोडू शकत नाही, पण ज्या पद्धतीने मुंबईची संस्कृती मारली जातेय ते चिंताजनक आहे. कोणीही येतो आणि सांगतो या भागाची भाषा गुजराती आहे. आमच्यावर हिंदीची सक्ती करणार, म्हणजेच तुम्ही आमची सगळी अस्मिता व संस्कृती मारणार आणि केवळ नावालाच मुंबई महाराष्ट्रात ठेवणार? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. मराठी माणूस हा कामगार, श्रमिक, लढवय्या होता. आज तो बाहेर गेला आणि संपूर्ण मुंबईची संपत्ती ही एका विशिष्ट वर्गाच्या हातात आहे, ती सातत्याने गुजरातला पळवण्याचा प्रयत्न होतोय, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे. हेही वाचा : Farah Khan Birthday: दीपिका पादुकोणपासून घरचा कुक दिलीपपर्यंत अनेकांची कारकीर्द उजळवणाऱ्या फराह खान