Mallika Prasad : नुकताच अभिनेत्री राणी मुखर्जीचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘मर्दानी ३’ चा अंगावर काटा आणणारा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. राणी पुन्हा एकदा शिवानी शिवाजी रॅाय या धाडसी पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत परतली आहे. यापूर्वी प्रदर्शित झालेल्या मर्दानी १ आणि मर्दानी २ चित्रपटांना उदंड प्रतिसाद प्रेक्षकांनी दिला होता. आता मर्दानी ३ मध्ये राणीला पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहे. या चित्रपटात खलनायक अभिनेत्रीच्या भूमिकेत असलेल्या मल्लिका प्रसादची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. ट्रेलरमधून तिने साकारलेल्या अम्मा या खलनायकी पात्राची खोली तिने कशा प्रकारे साकारली असेल हे प्रकषाने जाणवते. या चित्रपटाची कथा ८ ते ११ वयोगटातील ९३ मुली बेपत्ता झाल्या असून, याचा तपास करण्याची जबाबदारी शिवानी रॅाय हिच्यावर सोपविण्यात आली आहे. शिवानी या प्रकरणाची चौकशी करताना तिला एक निर्दयी महिलेबाबत समजते. गुन्हेगारी जगात तिला “अम्मा” म्हणून ओळखले जाते. अम्मा मुलांचे अपहरण करणारी, त्यांची तस्करी करण्यास भाग पाडणारी एक अत्यंत क्रूर महिला आहे. ट्रेलरमध्ये अम्माचे पात्र खूपच प्रभावी आणि भीतीदायक दिसते. ती शांत दिसत असली तरी क्रूर आहे. पहिल्या दोन भागांमध्ये पुरुष खलनायक होते. मात्र, तिसऱ्या भागात खलनायकाच्या भूमिकेत एक महिला आहे. अम्मा या खलनायक पात्राची भूमिकेत दिसलेली अभिनेत्री मल्लिका प्रसाद ही ज्येष्ठ अभिनेत्री, नाट्य कलाकार, दिग्दर्शक असून, पेक्षाने शिक्षिका आहे. ती मूळची बंगळुरूची असून तिने लंडनच्या गोल्डस्मिथ्स कॉलेजमधून परफॉर्मन्स मेकिंगमध्ये मास्टर्स आणि नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून अभिनयात पदव्युत्तर डिप्लोमा केला आहे. मल्लिकाने 1999 मध्ये कन्नड चित्रपट कानुरू हेग्गादिथीमधून पदार्पण केले. त्यानंतर ती कन्नड चित्रपटात खूप लोकप्रिय झाली. तिच्या काही उल्लेखनीय चित्रपटांमध्ये मुसंजय कथा प्रसंग, गरवा आणि माघ मयुरी यांचा समावेश होतो. अलिकडच्या काळात ती नेटफ्लिक्सवरील द किलर सूप आणि अनुराग कश्यपच्या ऑलमोस्ट लव्ह विथ डीजे मोहब्बत या चित्रपटातून हिंदी प्रेक्षकांच्या भेटीला आली. तिने ‘फॉर माय एला’ या लघुपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाने अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये पुरस्कार जिंकलेले आहेत. मर्दानी 3 चे दिग्दर्शन अभिराज मिनावाला यांनी केले आहे. हा अॅक्शन-थ्रिलर चित्रपट ३० जानेवारी २०२६ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. हेही वाचा : “यापुढे कोणत्याही कारवाईला योग्य प्रत्युत्तर देणार…” ; लष्कर प्रमुखांचा पाकिस्तानला कडक संदेश