नागठाणे : कराड उत्तरच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असून तासवडे गाव महामार्गावर असल्यामुळे व मोठी एमआयडीसी असल्याने गाव ‘रोल मॉडेल’ करणार असल्याची ग्वाही आमदार मनोज घोरपडे यांनी दिली. आमदार मनोज घोरपडे यांच्या हस्ते तासवडे येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. महेशबाबा जाधव, उमेश मोहिते, भिकूअण्णा जाधव, अमित जाधव, बाजीराव जाधव, राजेंद्र जाधव, सरपंच दीपाली जाधव, उपसरपंच मनीषा जाधव, तुकाराम बुवा, संदीप जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. आ. घोरपडे म्हणाले, ‘‘कराड उत्तरमधील काही गावांना तीन लाख, पाच लाख, दहा लाख या पद्धतीने निधी आजपर्यंत मिळत होता. परंतु, आपण सर्वांनी कराड उत्तरमध्ये परिवर्तन केले आणि प्रत्येक गावामध्ये मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध व्हायला लागला आहे. केंद्र व राज्य सरकारच्या निधी येत असल्याने मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करता येतो आणि अशा सर्व प्रकारचा निधी आणून कराड उत्तरचा सर्वांगीण विकास करण्यास कटीबद्ध आहे. विकासाबरोबरच सर्वसामान्य लोकांच्या गाठीभेटी घेणे त्यांच्या अडचणी सोडवणे यासाठी कायमच मतदारसंघातील प्रत्येक गावामध्ये संपर्क दौरा करत असतो. माझ्याकडे येताना कोणालाही कोणाच्या शिफारशीची गरज पडत नाही. सामान्यातला सामान्य माणूस थेट माझ्याकडे येऊ शकतो.’’ सरपंच दीपाली जाधव यांनी प्रास्ताविकात गावातील प्रलंबित प्रश्नांबद्दल आग्रही भूमिका मांडली. विलास माने, लक्ष्मण जाधव, रंजीत जाधव, निलेश डुबल, संदीप माने, शंकर पाटील, अरुण पवार, प्रकाश पवार, अमोल पवार, महेश चव्हाण, चंद्रकांत जाधव, दिगंबर पाटील, वैभव चव्हाण, अनिल माने, संतोष पाटील, विशाल मोहिते, शहाजी मोहिते, सुनील पाटील, सुभाष जाधव, शामराव जाधव, सुनील जाधव, दादासो मोहिते, दिनेश घाडगे, राजन पाटील यांच्यासह गावातील मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांचा भाजपा प्रवेश… तासवडे गावातील माजी सरपंच राजेंद्र जाधव, तंटामुक्ती अध्यक्ष सुनील पाटील, माजी उपसरपंच सुभाष जाधव, शालेय समिती अध्यक्ष सुनील जाधव, माजी शालेय समिती अध्यक्ष शामराव जाधव यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.