Sanjay Raut : नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीनंतर आता महापालिका निवडणुकांचे वेध सर्वांना लागले असून, येत्या १५ जानेवारीला राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान होणार आहे. आजपासून म्हणजेच २३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात झाली आहे. मुंबई महापालिकेसह राज्यातील इतर महापालिकांसाठी स्थानिक समीकरणाची जुवळाजुवळ करत पुन्हा एकदा महायुतीमधील घटक पक्ष आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांकडून रणनितीची आखणी केली जात आहे. नगपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत महायुतीच नंबर वन असल्याचे सिद्ध झाले आहे. महाविकास आघाडीसाठी ही निवडणूक धक्का देणारी ठरली आहे. आता महापालिका निवडणुकीत मोठे आव्हान आघाडीपुढे असणार हे निश्चित आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत युती करणार असल्याची माहिती आहे. पुणे महापालिकासाठी जवळपास युती निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली असून, पिंपरी चिंचवडसाठी चर्चां सुरू आहेत. या सगळ्या घडामोंडीवर उबाठा गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. ” जर उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येताहेत, तर काका पुतणे एकत्र आले तर आम्ही का टीका करावी. आम्ही कुटुंबामध्ये एकत्र येत आहोत राजकीयदृष्ट्या नाही तर भावनिक दृष्या. त्यामुळे ते एकत्र आले तर त्यांच्यावर टीका करणे मला योग्य वाटत नाही” अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चांवर दिली आहे. पत्रकाराने करून दिली ‘त्या’ विधानाची आठवण पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने संजय राऊत यांना त्यांनी केलेल्या एका विधानाची आठवण करून दिली. अजित पवारांशी हात मिळवणी म्हणजेच भाजपशी हातमिळवणी असल्याचे विधान संजय राऊत यांनी केले होते. यावर संजय राऊत उत्तर देताना म्हणाले, याबाबत माझं शरद पवार साहेबांशी बोलणं झालं आहे अशा प्रकारे काही घडले याबाबत त्यांनी शंका व्यक्त केली आहे, असे म्हणून राऊत यांनी अधिकचे भाष्य करणे टाळल्याचे पाहायला मिळाले. काय घडणार? याकडे असणार लक्ष येत्या काही दिवसांत दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार असल्याचे पक्के मानले जात आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत निर्णय झाला असून येत्या २५ किंवा २६ डिसेंबरला याची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुण्याचे शहराध्यक्ष सुभाष जगताप यांनी दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार असून लवकरच घोषणा केली जाईल, असे माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत नेमकं काय घडणार याकडे लक्ष असणार आहे. हेही वाचा : दीपू हत्याकांडावरून गदारोळ! दिल्लीतील बांगलादेश उच्चायुक्तालयाबाहेर गोंधळ ; विहिंपचा निषेध