BMC Results 2026 – भाजप आणि शिंदेसेना युतीने महत्वाचे मिशन फत्ते करत मुंबई महापालिकेची सत्ता मिळवली. मात्र, काही घडामोडी आणि राजकीय नेत्यांच्या वक्तव्यांमुळे मुंबईच्या महापौर पदाचा सस्पेन्स वाढला आहे. आपल्या नगरसेवकांना लक्झरी हॉटेलमध्ये हलवण्याच्या शिंदेसेनेच्या कृतीमुळे भुवया उंचावल्या गेल्या आहेत. तशातच देवाच्या मनात असेल तर आपलाही महापौर होईल, असे कुतूहल चाळवणारे वक्तव्य ठाकरेसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. त्यामुळे कुठली वेगळी राजकीय समीकरणे पुढे येणार की काय, अशा चर्चांना तोंड फुटले आहे. ‘आता सगळं शांत आहे कुठेही पळवा पळवी नाही आहे’ – मुख्यमंत्री फडणवीस एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा त्यांचे विजयी उमेदवार खाजगी हॉटेलमध्ये ठेवलेत यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना उत्तर दिले. ‘आता सगळं शांत आहे कुठेही पळवा पळवी नाही आहे’ आम्ही एकत्रितपणे सगळे निर्णय घेणार आहोत त्यामुळे पळवा पळवीची आवश्यकता नाही. निकालानंतर शिंदेंनी उमेदवारांना एकत्रित राहायला बोलवलं असणार असं वक्तव्य फडणवीस यांनी केलं आहे. ‘देवाची इच्छा असेल तर आमचा महापौर होईल’ – उद्धव ठाकरे मुंबई महापालिकेमध्ये आमचे लोकप्रतिनिधी जातील, यांनी तिजोरी कशी खाली केली याचा भांडभोड मुंबई करांशी आमचे प्रतिनिधी करतील. देवाची इच्छा असेल तर महापौर आमचा होईल, मेवाची नाही, थोडा फार फरक आहे, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी नाव न घेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला.