Pankaja Munde : बीड जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी भाजप नेत्या मंत्री पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी मंत्री धनंजय मुंडे मैदानात उतरले होते. बहीण भावानी आयोजित केलेल्या प्रचार सभांमधून जोरदार भाषणबाजी करत मतदान करण्याचे आवाहन केले होते. दोघेही अनेक वर्षांनी या निवडणुकांसाठी एकत्रित पाहायला मिळाल्याने बीड जिल्ह्यासह राज्यात मोठी चर्चा झाली. मात्र, गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी खळबळजनक दावा केला आहे. धनंजय मुंडे यांच्या हत्येचा कट रचण्यात आला होता, असा मोठा दावा गुट्टे यांनी केला आहे. त्यांनी केलेल्या दाव्यामुळे राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, पंकजा मुंडे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. माझ्याकडे अशा नकारात्मक गोष्टी येत नाहीत आणि मी त्यावर बोलत नाही असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच खांद्याच्या दुखापतीमुळे प्रचारात काही काळ विश्रांती घ्यावी लागणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. मुंडे बहीण भाऊ यांनी प्रचार सभा गाजवल्या. पण पत्रकाराने तो प्रश्न विचारत पंकजा प्रचंड चिडल्या आणि त्यावर त्यांनी आपली प्रतिक्रिया देत असे न म्हणण्याचे आवाहन केले. नेमकं काय घडलं? तुम्ही बहिण भाऊ तेरा वर्षानंतर एकत्र येत एक पॅनेल देत निवडणुका लढवत आहात? या प्रश्नावर “तुम्ही आम्हाला पहिले बहिण भाऊ म्हणणे बंद करा, आम्ही बहीण भाऊ आहोत; पण सर्वात म्हत्वाचे म्हणजे आम्ही लिडर आहोत. ते राष्ट्रवादी आणि मी भाजपचे नेता आहे,” पुढे बोलताना पंकजा मुंडे यांनी युती ही परळीच्या हितासाठी झाली असल्याचे स्पष्ट केले. हेही वाचा : नगरपरिषद-नगरपंचायतींच्या निकालाची तारीख लांबणीवर; काय होणार परिणाम?