Elon Musk | Starlink subscription Plan : एलॉन मस्क यांच्या स्पेसएक्स कंपनीची उपकंपनी स्टारलिंक लवकरच भारतात सॅटेलाइट इंटरनेट सेवा सुरू करणार असून, कंपनीनं आपल्या मासिक सबस्क्रिप्शनची अधिकृत किंमत जाहीर केली आहे. दुर्गम, डोंगराळ आणि इंटरनेटपासून वंचित भागांमध्ये उच्च-गती इंटरनेट पोहोचवणे हा या सेवांचा मुख्य उद्देश आहे. कंपनीनं भारतासाठीच्या वेबसाइटवर रेसिडेन्शिअल प्लॅनचे दर अपडेट केले आहेत. स्टारलिंक रेसिडेन्शिअल प्लॅन – शुल्क व सुविधा : मासिक शुल्क: 8,600 रुपये हार्डवेअर किंमत: 34,000 रुपये (डिश अँटेना, राउटर इ.) पहिल्या महिन्याचा एकत्र खर्च: 42,600 रुपये यानंतर मासिक शुल्क: फक्त 8,600 रुपये अतिरिक्त सुविधा: 30 दिवसांचा ट्रायल पीरियड व अनलिमिटेड डेटा सेवेची मुख्य वैशिष्ट्ये : अनलिमिटेड हाय-स्पीड इंटरनेट 99.9% पेक्षा अधिक अपटाइम सर्व हवामानात काम करणारी सुविधा प्लग-ॲण्ड-प्ले सेटअप — सोपी आणि तत्काळ सुरू होणारी सेवा कोणतीही डेटा कॅप किंवा वेगाची मर्यादा नाही सध्या फक्त रेसिडेन्शिअल प्लॅनची किंमत जाहीर झाली असून, बिझनेस आणि एंटरप्राइज प्लॅन्सचे दर लवकरच घोषित होण्याची शक्यता आहे. भारतात विस्ताराची तयारी वेगात : स्टारलिंकनं भारतातील ऑपरेशन्स वाढवण्यासाठी काही महत्त्वाच्या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. पेमेंट्स मॅनेजर, अकाउंटिंग मॅनेजर, सीनियर ट्रेझरी अॅनालिस्ट आणि टॅक्स मॅनेजर अशी पदे कंपनीनं बेंगळुरूमध्ये जाहीर केली आहेत. सहा महानगरांमध्ये ग्राउंड स्टेशन्स : स्टारलिंक महत्वाच्या शहरांमध्ये गेटवे अर्थ स्टेशन उभारणार आहे यामध्ये…, ‘चंदीगड, हैदराबाद, कोलकाता, लखनऊ, मुंबई आणि नोएडा’ यांचा समावेश आहे. ही केंद्रे स्टारलिंकच्या उपग्रहांसोबत भारतातील ग्राहकांच्या डिशला जोडण्याचे काम करतील. जुलै 2024 मध्ये दूरसंचार विभागानं स्टारलिंकला पाच वर्षांचा व्यावसायिक परवाना दिला होता. ग्रामीण भारताचा इंटरनेट वेग वाढणार : स्टारलिंकच्या लो-अर्थ-ऑर्बिट उपग्रह तंत्रज्ञानामुळे 100–200 Mbps पर्यंत वेग मिळण्याची अपेक्षा आहे. यामुळे दुर्गम शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्रे, आदिवासी विभाग आणि इंटरनेटपासून वंचित ग्रामपंचायती यांना विश्वासार्ह आणि वेगवान इंटरनेट उपलब्ध होईल.