पुणे : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते वसंत मोरे आणि त्यांचा मुलगा रुपेश मोरे यांना महापालिका निवडणुकीतपराभवाला सामोरे जावे लागले आहे. मतमोजणीदरम्यान प्रतिस्पर्धी उमेदवाराने आघाडी घेत निर्णायक विजय मिळवला. वसंत मोरे यांचा पराभव हा ठाकरे गटासाठी मोठा राजकीय धक्का मानला जात असून स्थानिक पातळीवर याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. निवडणूक प्रचारात मोठी ताकद लावूनही मतदारांचा कौल त्यांच्या बाजूने वळू शकला नाही. राज्यात आतापर्यंत कोणत्या पक्षाचे किती उमेदवार विजयी? राज्यातील महानगरपालिकांचे निकाल हाती येत असून यामध्ये सर्वात जास्त जागा या भाजप पक्षाला मिळाल्या आहेत. यामध्ये भाजपला सध्या 920 जागा मिळाल्या असून शिवसेना 237 तर काँग्रेस 172, शिवसेना UBT ला 124 जागा, अजित पवार-110, MIM- 41, वंचित-18, राष्ट्रवादी- शरद पवार- 18, मनसे- 11 आणि इतरमध्ये-144 उमेदवार विजयी झाले आहेत.