Devendra fadnavis | Eknath shinde : सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेत तब्बल 25 वर्षांनंतर ठाकरे गटाची सत्ता भाजप आणि एकनाथ शिंदे गटाच्या युतीने उलथवून लावली आहे. या निवडणुकीत भाजपने 89 जागांवर विजय मिळवला असून, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 65 जागा मिळाल्या आहेत. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 29 जागा मिळाल्याने भाजप-शिंदे गटाची सत्ता स्थापन होणे जवळपास निश्चित मानले जात आहे. दरम्यान, शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांना आज दुपारी तीन वाजता वांद्र्याच्या ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पक्षातील कोणताही नगरसेवक फुटू नये, तसेच सत्तास्थापनेदरम्यान एकसंघ राहावे, यासाठी हा निर्णय घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा त्यांचे विजयी उमेदवार खाजगी हॉटेलमध्ये ठेवलेत यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना उत्तर दिले. ‘आता सगळं शांत आहे कुठेही पळवा पळवी नाही आहे’ आम्ही एकत्रितपणे सगळे निर्णय घेणार आहोत त्यामुळे पळवा पळवीची आवश्यकता नाही. निकालानंतर शिंदेंनी उमेदवारांना एकत्रित राहायला बोलवलं असणार असं वक्तव्य फडणवीस यांनी केलं आहे.