Shefali Shah : १९९५ मध्ये ‘रंगीला’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याकाळात दिग्दर्शक राम गोपाल वर्मा हे मोठं नाव समजले जात होते. त्यांनीच रंगीला चित्रपटाचे दिग्दर्शक केले होते. या चित्रपटात अभिनेत्री उर्मिला मातोंडकर मुख्य भूमिकेत होती. उर्मिलाने मिली नावाची मुख्य भूमिका चित्रपटात साकारली होती. तर अभिनेता आमिर खान आणि जॅकी श्रॅाफ यांच्या महत्वाच्या भूमिका होत्या. पण मिली ही व्यक्तीरेखा अभिनेत्री शेफाली शाह हिला अॅाफर करण्यात आली होती. याबाबत स्वतः अभिनेत्रीने एका मुलाखतीत खुलासा केला आहे. रंगीला चित्रपटात शेफाली शाहला मुख्य भूमिकेसाठी राम गोपाल वर्मा यांनी कास्ट केले होते. चित्रपटाच्या चित्रीकरणालाही सुरूवात झाली. मात्र, शेफालीने मधूनच हा चित्रपट सोडला याचे कारणही तिने सांगितले आहे. तिच्या मते जशी भूमिकेचे वर्णन करण्यात आले होते, तसे प्रत्यक्षात नव्हते म्हणूनच चित्रपट न करण्याचा निर्णय तिने घेतला. “मी म्हणेन की जे लोक असे करतात ते एकतर खूप धाडसी असतात किंवा मूर्ख असतात. माझ्या बाबतीत ते काय होते हे मला माहित नाही. पण मला त्याच्या चित्रपटाचे महत्त्व समजले नाही. फक्त मला एक चित्रपट ऑफर करण्यात आला होता. ज्या पद्धतीने भूमिकेचे वर्णन केले होते. त्यावरून ती खूप महत्वाची वाटली. पण ती तशी नव्हती, असा मोठा खुलासा अभिनेत्री शेफाली शाहने केला आहे. याविषयी बोलताना शेफाली म्हणाली, रंगीलामध्ये तिचे काही सीन शूट करण्यात आले होते. पण शूटिंगच्या दोन ते तीन दिवसांनंतर तिने हा चित्रपट मधूनच सोडला. मात्र, त्यानंतर १९९७ मध्ये आलेल्या सत्या चित्रपटात शेफालीने छोटी पण लक्षात राहणारी भूमिका साकारली होती. सध्या शेफाली तिच्या दिल्ली क्राइम्स सीझन तीनमुळे चर्चेत असून, ती दिग्दर्शक संजय लीला भन्साळींच्या “लव्ह अँड वॉर” मध्ये दिसणार आहे. हेही वाचा : बारामती परिमंडळात वीज चोरीविरूध्द 1,443 जणांवर कारवाई