Rohit Sharma Equalled All Time Record : भारतीय देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात मोठी वन-डे स्पर्धा ‘विजय हजारे ट्रॉफी २०२५-२६’ ला २४ डिसेंबरपासून दणक्यात सुरुवात झाली आहे. स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी फलंदाजांचे वर्चस्व पाहायला मिळाले, जिथे तब्बल २२ शतकी खेळींची नोंद झाली. मात्र, सर्वांचे लक्ष वेधले ते टीम इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्मा याने. प्रदीर्घ काळानंतर या प्रतिष्ठित स्पर्धेत पुनरागमन करत रोहितने पहिल्याच सामन्यात ऐतिहासिक खेळी केली. सिक्किमविरुद्ध वादळी १५५ धावा – मुंबईकडून खेळताना रोहित शर्माने आपली ‘क्लास’ आजही कायम असल्याचे सिद्ध केले. सिक्किमविरुद्धच्या सामन्यात रोहितने अवघ्या ९४ चेंडूंमध्ये १५५ धावांची तुफानी खेळी केली. या खेळीत त्याने १८ चौकार आणि ९ उत्तुंग षटकार ठोकले. रोहितच्या या आक्रमक फलंदाजीने जयपूरचे मैदान अक्षरशः ओसंडून वाहिले. डेव्हिड वॉर्नरच्या जागतिक विक्रमाशी केली बरोबरी – या शतकी खेळीसह रोहितने लिस्ट-ए क्रिकेटमध्ये एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. लिस्ट-ए क्रिकेटमध्ये १५० पेक्षा जास्त धावांची खेळी करण्याच्या बाबतीत रोहितने ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरची बरोबरी केली आहे. रोहितची ही अशी ९वी खेळी ठरली, जिथे त्याने दीडशे धावांचा टप्पा पार केला. हेही वाचा – Karnataka Team : कर्नाटकचा ऐतिहासिक पराक्रम! झारखंडचा धुव्वा उडवत मोडला १३ वर्षांपूर्वीचा विक्रम दिग्गजांच्या यांदीत पटकावले स्थान – रोहित शर्माचे हे लिस्ट-ए क्रिकेटमधील ३७ वे शतक ठरले. यासह तो लिस्ट-ए मध्ये सर्वाधिक शतके ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. या यादीत आता त्याच्यापुढे विराट कोहली, सचिन तेंडुलकर, ग्रॅहम गूच आणि कुमार संगकारा यांसारखे दिग्गज खेळाडू आहेत. हेही वाचा – Year Ender 2025 : कसोटी ते आयपीएल: २०२५ मधील ‘न भूतो न भविष्यती’ ५ मोठे रेकॉर्ड्स दुसरा सर्वात ज्येष्ठ शतकवीर – वयाच्या ३८ वर्षे २३८ व्या दिवशी शतक झळकावून रोहित विजय हजारे ट्रॉफीच्या इतिहासातील दुसरा सर्वात ‘वयस्कर’ शतकवीर ठरला आहे. या यादीत ३९ वर्षीय अनुस्तूप मजूमदार पहिल्या क्रमांकावर आहे. मुंबईचा पुढील सामना २६ डिसेंबर रोजी उत्तराखंड विरुद्ध जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यातही ‘हिटमॅन’ कडून अशाच मोठ्या खेळीची अपेक्षा क्रीडाप्रेमींना आहे.