Rohit Sharma record 7000 runs in Asia : न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्माने एक खास कामगिरी केली. जरी रोहित या सामन्यात मोठी खेळी करू शकला नसला, तरी त्याने आशिया खंडात फलंदाजी करताना वनडेत ७००० धावांचा टप्पा ओलांडला आहे. हा टप्पा गाठणारा तो सातवा आशियाई फलंदाज ठरला आहे. धोनीच्या विक्रमाजवळ पोहोचला- आशियात सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीयांच्या यादीत रोहितने आता एमएस धोनीच्या विक्रमाला आव्हान दिले आहे. धोनीच्या नावावर आशियामध्ये ७१०३ धावा आहेत, तर रोहितच्या नावावर आता ७०१९ धावा झाल्या आहेत. या यादीत महान फलंदाज सचिन तेंडुलकर १२,०६७ धावांसह अव्वल स्थानी आहे. आशियात सर्वाधिक धावा करणारे फलंदाज: सचिन तेंडुलकर (भारत): १२,०६७ धावा विराट कोहली (भारत): ९१२१ धावा सनथ जयसूर्या (श्रीलंका): ८४४८ धावा कुमार संगकारा (श्रीलंका): ८२४९ धावा महेला जयवर्धने (श्रीलंका): ७३४२ धावा एमएस धोनी (भारत): ७१०३ धावा रोहित शर्मा (भारत): ७०१९ धावा हेही वाचा – Virat Kohli Record : पहिल्या चेंडूवर चौकार ठोकत विराटने रचला इतिहास! सचिनला मागे टाकत ठरला पहिलाच खेळाडू न्यूझीलंडसमोर ठेवले २८५ धावांचे लक्ष्य – नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाने ५० षटकांत ७ गडी बाद २८४ धावा केल्या. रोहित शर्मा (२४) आणि शुबमन गिल (५६) यांनी ७० धावांची सलामी दिली. मधल्या फळीत विराट कोहली (२३) आणि श्रेयस अय्यर (८) स्वस्तात बाद झाले. हेही वाचा – KL Rahul Record : केएल राहुल ‘डेथ ओव्हर्सचा’ नवा किंग! आठव्या शतकासह मोडला ग्लेन फिलिप्सचा वर्ल्ड रेकॉर्ड मात्र, अनुभवी फलंदाज केएल राहुलने एकाकी झुंज देत ११२ धावांची नाबाद शतकी खेळी केली. त्याला रवींद्र जडेजाने (२७) मोलाची साथ दिली. यामुळे भारताला न्यूझीलंडसमोर विजयासाठी २८५ धावांचे आव्हानात्मक लक्ष्य ठेवता आले.