Rinku Singh storms in SMAT 2025 : भारतीय क्रिकेट संघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३ वनडे सामन्यांच्या मालिकेनंतर ९ डिसेंबरपासून ५ सामन्यांची टी२० मालिका खेळायची आहे, ज्यासाठी बीसीसीआयने ३ डिसेंबर रोजी संघ जाहीर केला. या संघात हार्दिक पंड्याचे पुनरागमन झाले, पण युवा फलंदाज रिंकू सिंगला वगळण्यात आले. यानंतर रिंकूने चंदीगडविरुद्ध वादळी साकारुन सर्वांचे लक्ष्य वेधले. रिंकू सिंगची स्फोटक फलंदाजी – आशिया चषक २०२५ आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील टी२० मालिकेत रिंकूला केवळ एकच सामना खेळण्याची संधी मिळाली होती. टीम इंडियातून बाहेर पडल्यानंतर रिंकू सिंगने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये आपल्या आक्रमक फलंदाजीचा जलवा दाखवला आहे. त्याने ४ डिसेंबर रोजी ग्रुप-बी मध्ये उत्तर प्रदेश आणि चंदीगड यांच्यातील सामन्यात फक्त १० चेंडूंमध्ये २४ धावांची तुफानी खेळी केली. यावेळी त्याचा स्ट्राइक रेट २४० राहिला आणि त्याने आपल्या या छोटेखानी, पण महत्त्वाच्या खेळीत २ चौकार आणि २ उत्तुंग षटकार लगावले. त्याचबरोबर समीर रिझवीनेही ४२ चेंडूंमध्ये ७० धावांची दमदार खेळी केली. ज्यामुळे उत्तर प्रदेशने २० षटकांत ७ गडी गमावून २१२ धावांचा मोठा डोंगर उभा केला. हेही वाचा – Hardik Pandya : हार्दिक पंड्याचे फॅन आयोजकांसाठी ठरले डोकेदुखी! अचानक बदलावे लागले सामन्याचे ठिकाण यूपीच्या गोलंदाजांचा प्रभावी मारा – रिंकूच्या या खेळीमुळेच संघाला २०० धावांचा टप्पा ओलांडता आला. त्याचबरोबर समीर रिझवीनेही ४२ चेंडूंमध्ये ७० धावांची दमदार खेळी केली. यानंतर २१३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चंदीगडचा संघ २० षटकांत १७२ धावांपर्यंतच मजल मारू शकला आणि उत्तर प्रदेशने सहज विजय मिळवला. हेही वाचा – Joe Root Century : …तर हेडनला नग्न धावावं लागलं असतं! रुटच्या शतकाने वाचवली लाज उत्तर प्रदेशच्या गोलंदाजीत अनुभवी भुवनेश्वर कुमार चमकला. त्याने ४ षटकांत फक्त २३ धावा देत ३ महत्त्वपूर्ण विकेट्स घेतल्या आणि संघाच्या विजयात मोठी भूमिका बजावली. याव्यतिरिक्त, विपराज निगमने २, तर शिवम मावी, कार्तिक त्यागी आणि प्रशांत वीर यांनी प्रत्येकी १-१ विकेट्स घेतली. या विजयामुळे उत्तर प्रदेशने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२५ मध्ये आपल्या पाचव्या सामन्यात तिसरा विजय नोंदवला.