नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना यूपी वॉरियर्सची सुरुवात अत्यंत खराब झाली. मेग लॅनिंग (१४), हरलीन देओल (११) आणि फिबी लिचफिल्ड (२०) यांसारख्या स्टार खेळाडूंना मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले. आरसीबीच्या शिस्तबद्ध माऱ्यामुळे यूपीची अवस्था बिकट झाली होती. मात्र, तळाला दीप्ती शर्माने (नाबाद ४५) आणि डिएंड्रा डॉटीनने (नाबाद ४०) केलेल्या फटकेबाजीमुळे यूपीला ५ बाद १४३ धावांपर्यंत मजल मारता आली.
\nहेही वाचा – Devdutt Padikkal Record : देवदत्त पडिक्कलने रचला इतिहास! ‘असा’ पराक्रम करणारा भारताचा पहिलाच फलंदाज
\nआरसीबीचा एकतर्फी विजय –
\n\n\nDominant! ❤️@RCBTweets go 🔝 of the #TATAWPL 2026 points table with a clinical 9⃣-wicket victory 👏
\nScorecard ▶️ https://t.co/U1cgf01ys0 #KhelEmotionKa | #RCBvUPW pic.twitter.com/kjOFG7pjiJ
\n— Women’s Premier League (WPL) (@wplt20) January 12, 2026
\n१४४ धावांचे लक्ष्य आरसीबीच्या ताकदवान फलंदाजीसमोर किरकोळ ठरले. स्मृती मानधना (४७*) आणि ग्रेस हॅरिस (८५) यांनी झंझावाती फलंदाजी करत पॉवरप्लेमध्येच सामन्याचा निकाल स्पष्ट केला होता. आरसीबीने केवळ एक गडी गमावून १२.१ षटकांत हे लक्ष्य सहज पार केले आणि चाहत्यांना विजयाची मोठी भेट दिली.