Actress Rashmika Mandanna : अभिनेत्री रश्मिका मंदान्ना साऊथ स्टार अभिनेता विजय देवरकोंडाची कौतुक करण्याची एकही संधी सोडत नाही. आता अभिनेत्रीने पुन्हा एकदा विजयचे त्याचा आगामी चित्रपट “राउडी जनार्दन” साठी कौतुक केले आहे. विजय देवरकोंडा त्याच्या आगामी राउडी जनार्दन चित्रपटामुळे चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वीच या नवीन चित्रपटाच्या घोषणा करण्यात आली. नुकताच एक व्हिडीओ चित्रपटाच्या शीर्षकासह रिलीज करण्यात आला आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी २०२६ मध्ये प्रदर्शित होणार आहे. यावर रश्मिकाने प्रतिक्रिया दिली आहे. चित्रपटाबद्दलचा तिचा उत्साह व्यक्त करताना रश्मिकाने संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. तिने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर टायटल व्हिडीओ शेअर केला आहे. “वाह, हे अद्भुत आहे! हे अद्भुत आहे! काय दृश्ये! काय संगीत! काय वातावरण! काय कलाकार!” अशी प्रतिक्रिया रश्मिकाने दिली आहे. विजय देवरकोंडा आणि रवी किरण कोला तुम्ही दोघेही अद्भुत आहात. मला हे खूप आवडले. कीर्ती सुरेश या चित्रपटासाठी तुला शुभेच्छा, असेही रश्मिकाने पोस्टमध्ये लिहिले आहे. गेल्या काही दिवसांपासून विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदान्ना यांच्या अफेअरच्या बातम्या समोर येत असून दोघेही २०२६ मध्ये लग्न करणार असल्याची शक्यता आहे. ऑक्टोबरमध्ये दोघांचा साखरपुडा झाल्याची चर्चा होती. यावर दोघांनीही मौन बाळगले असून अद्यापर्यंत खुलासा केलेला नाही. विजयच्या कामाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास तो “किंगडम” चित्रपटात दिसला होता. चित्रपटाले फारसे यश बॅाक्स अॅाफिसवर मिळाले नाही. त्यामुळे त्याच्या आगामी राउडी जनार्दनमध्ये तरी काहीतरी करिश्मा विजय करणार असल्याचा विश्वास चाहत्यांना आहे. हा विश्वास किती खरा ठरतो हे चित्रपट प्रदर्शित झाल्यावर समजू शकेल. हेही वाचा : “‘त्या’ ठिकाणच्या आमदारांचा पत्ता कट होणार हे नक्की..” ; योगी आदित्यनाथांनी का दिला कडक इशारा? वाचा