Actress Rashmika Mandanna : अभिनेत्री रश्मिका मंदान्ना सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील स्टार कलाकार म्हणून ज्याला ओळखले जाते त्या अभिनेता विजय देवरकोंडासोबतच्या तिच्या लग्नाबाबत चर्चा होत आहेत. या चर्चांदरम्यान अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांनी गुपचूप लग्न उरकले असल्याचा दावा केला जात आहे. तर काही माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार त्यांचे लग्न पुढच्या वर्षी फेब्रुवारी २०२६ मध्ये होणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे चाहते या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र, लग्नाबाबत दोघांनीही अधिकृत माहिती दिलेली नाही. रश्मिका तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर सतत सक्रीय असते. तिने एक पोस्ट शेअर करून पोस्टला लक्ष वेधून घेणारे कॅप्शन दिले आहे. View this post on Instagram A post shared by Rashmika Mandanna (@rashmika_mandanna) रश्मिकाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून स्वतःचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत तिने पिवळ्या रंगाचा टी शर्ट आणि जीन्स वेअर केलेली दिसत आहे. पोस्टच्या कॅप्शनमध्ये “हे दिवस असे दिसतात… खूप तास, खूप काम, चांगले जेवण, थकलेले डोळे… आणि पिवळा रंग दिवसाला पुन्हा सुंदर बनवत आहे.” असे म्हटले आहे. शेअर केलेल्या एका फोटोमध्ये रश्मिका गोंधळलेल्या लूकमध्ये दिसत आहे. या पोस्टवरून लक्षात येते की रश्मिकाने कामामुळे होत असलेली धावपळ अधोरिखेत केली आहे. या पोस्टवर नेटिझन्स प्रतिक्रिया देत आहेत. नेटकऱ्यांनी रश्मिकाला आराम करण्याचा सल्ला दिला आहे. कामाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास रश्मिका आगामी ‘कॉकटेल २’ या आगामी चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात ती क्रिती सॅनेन आणि शाहिद कपूरसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. हेही वाचा : “सत्तेतून पैसा आणि पैशातून पुन्हा सत्ता मिळवण्याचा हा प्रयत्न…”; किशोरी पेडणकरांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल